16 October 2019

News Flash

अनेक वर्षांनंतर पैनगंगा अभयारण्यात पट्टेदार वाघाचे दर्शन!

वाघाच्या वास्तव्याने जंगल काठच्या गावांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

पैनगंगा अभयारण्य अंतर्गत बिटरगाव वनपरिक्षेत्रातील मसलगाच्या जंगलात अकोली कक्ष क्रमांक 488 मध्ये पट्टेदार वाघाचे पहिल्यांदाच दर्शन झाले आहे. हस वाघ वनविभागाने लावलेल्या कॅमेर्‍याच्या ट्रॅपमध्ये सापडला असून तीन दिवसापूर्वी सायंकाळी शिकारीच्या शोधात असलेल्या वाघ आढळून आला.

याबाबत बिटरगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एच. गोरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी याची पुष्टी केली आहे. अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर बिबटे, रानडुक्कर आदी वन्य प्राणी असून अधूनमधून अभयारण्यात पट्टेदार वाघ बसल्यात, वाघाची वास्तव्य असल्याची चर्चा होत होती. परंतु, त्या चर्चांना दुजोरा आजपर्यंत मिळाला नव्हता. अभयारण्यात याच वर्षी पहिल्यांदाच विविध ट्रॅकांग स्पॉटवर काही दिवसांपूर्वीच कॅमेरे बसविण्यात आले.

दरम्यान 6 ऑक्टोबर रोजी मसलगा जंगलातील अकोली बीडमधील कक्ष क्रमांक 488 मध्ये सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या वाघाचे दर्शन झाले आहे. कॅमेर्‍यात वाघाचे अगदी स्पष्ट दर्शन होत असून हा वाघ अत्यंत परीपक्व व पूर्ण वाढ झालेला दिसून येत आहे. वाघाच्या वास्तव्याने अभयारण्यात खर्‍या अर्थाने संरक्षण व संवर्धनाला गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वाघाच्या वास्तव्याने जंगल काठच्या गावांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

First Published on October 10, 2019 6:56 am

Web Title: painganga wildlife white tiger nanded nck 90