पंढरपूर येथे आज नवे ६ करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णाची संख्या आता ४७ झाले असून १८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर १ मयत झाला असून वाखरी येथील कोविड सेंटर येथे २८ रुग्णावर उपचार सुरु असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ एकनाथ बोधले यांनी दिली आहे. दरम्यान,आज सापडलेले सर्व रुग्ण हे संस्थात्मक विलगीकरण केले होते.
पंढरपूर मध्ये करोनाचे रुग्ण वाढत असले तरी बरे होण्याचे प्रमाण देखील आहे. गुरुवारी ८ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले होते. मात्र शुक्रवारी सकाळी पुन्हा नव्याने ६ रुग्ण आढळून आले. शहरातील रुग्ण असून यात ५ पुरुष तर एक स्त्रीचा समावेश आहे. हे सर्वजण संपर्कांतील असून त्यांना संस्थात्मक विलगीकरण केले होते. मात्र, आता या सहा जणांच्या संपर्कांत व्यक्तींची यादी बनवून त्यात अतिधोकादायक आणि धोकादायक व्यक्तींची यादी बनविण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान, पंढरपूर येथे आता पर्यंत ४७ रुग्ण होते. यात १८ जण करोनामुक्त होऊन घरी गेले असून १ मयत आहे. तर २८ जण उपचार घेत आहेत. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील २१ रुग्ण असून इतर तालुक्यातील ७ रुग्ण आहेत. असे असले तरी नागरिकांनी काळजी घ्यावी आणि आवश्यक असले तर घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 10, 2020 12:12 pm