27 February 2021

News Flash

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर अनंतात विलीन, अखेरचा निरोप देण्यासाठी लोटला जनसागर

गुरुवारी मुंबईतील सोमय्या रुग्णालयात ह्रदयविकाराच्या झटक्याने पांडुरंग फुंडकर यांचं निधन झालं

राज्याचे क़ृषीमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर अनंतात विलीन झाले आहेत. खामगाव येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी मुंबईतील सोमय्या रुग्णालयात ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं होतं. आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी खामगावात जनसागर लोटला होता. अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्यविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहब दानवे यांच्यासहित अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

३१ मे रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास पांडुरंग फुंडकर यांनी मुंबईतील सोमय्या रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत.

फुंडकर हे भाजपाच्या पहिल्या फळीचे नेते होते. त्यांनी यापूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले होते. वर्ष १९९१ ते ९६ या काळात त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले. फुंडकर यांनी तीन वेळा अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी १९७८ आणि १९८० मध्ये खामगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. फुंडकर हे विधानपरिषदेतील विरोध पक्षनेतेही होते. ८ जुलै २०१६ रोजी त्यांनी फडणवीस मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 1:25 pm

Web Title: pandurang fundkar final cremation in khamgaon
Next Stories
1 गॅस सुरू राहिल्यामुळे झालेल्या स्फोटात चिमुरड्यानं गमावले प्राण
2 VIDEO: मोटरसायकलसोबत चालकाचीही टोईंग व्हॅननं काढली परेड, पुण्यातला प्रकार
3 अहमदनगर – अहल्यादेवी होळकर जयंती उत्सवात गोंधळ घातल्याप्रकरणी 51 जणांना अटक
Just Now!
X