परभणीच्या महापौरपदाच्या निवडणुकीनिमित्त मराठवाड्यात सत्तेचा ‘नवा फॉर्म्युला’ तयार झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने काँग्रेसचा महापौर विराजमान झाला. काँग्रेसच्या मीनाताई वरपुडकर यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली. तर काँग्रेसचे सय्यद समी सय्यद साहेबजान उर्फ माजू लाला यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. वरपुडकर यांना ६५ पैकी ४० मते मिळाली. भाजप नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. तर शिवसेनेने तटस्थ भूमिका घेतली.

परभणी महापौरपदासाठी बी. रघुनाथ सभागृहात पीठासीन अधिकारी पी. शिवाशंकर, आयुक्त राहुल रेखावार, नगरसचिव चंद्रकांत पवार यांच्या उपस्थितीत मतदान घेण्यात आले. महापौरपदासाठी एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यात संतोषी सुनील देवकर (भाजप), शेख अलिया अंजूम मो. गौस (अपक्ष-राष्ट्रवादी पुरकृत), मीनाताई वरपुडकर (काँग्रेस), खान मुनसीब नय्यर विखार (काँग्रेस) यांचा समावेश होता. यापैकी देवकर आणि खान मुनसीब नय्यर विकार या दोघांनी माघार घेतली. १५ मिनिटांचा अवधी दिल्यानंतर महापौरपदासाठी मतदान घेण्यात आले. एकूण ६५ पैकी ५९ नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. मिनाताई वरपुडकर यांना ४० मते मिळाली. तर अपक्ष राष्ट्रवादी पुरस्कृत शेख अलिया अंजूम मो.गौस यांना १८ मते मिळाली. शिवसेना तटस्थ राहिली. भाजपने ‘हात’ दिल्याने वरपुडकर यांचा विजय झाला. त्यानंतर उपमहापौरपदासाठी एकूण ६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यात प्रशास चंद्रशेखर ठाकूर (शिवसेना), रंजनाबाई प्रल्हादराव सांगळे (भाजप), सय्यद समी सय्यद साहेबजान उर्फ माजू लाला (काँग्रेस), भगवानराव नारायणराव वाघमारे (काँग्रेस), गुलमीर खान कलंदर खान (काँग्रेस), डॉ.विद्या प्रफुल्ल पाटील (भाजप) यांचा समावेश होता. १५ मिनिटांच्या अवधीनंतर मतदान घेण्यात आले. यात प्रशास चंद्रशेखर ठाकर (शिवसेना), भगवानराव वाघमारे (कॉंग्रेस), गुलमीर खान कलंदर खान (कॉंग्रेस) यांनी माघार घेतली. उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे माजू लाला आणि भाजपच्या डॉ. विद्या प्रफुल्ल पाटील यांच्यात थेट लढत झाली. माजू लाला यांना ३२ मते मिळाली, तर डॉ.विद्या पाटील यांना ८ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तटस्थ राहिली.

Sangli Lok Sabha, Sangli,
सांगलीत काँग्रेस आमदारांची झाली पंचाईत
congress leadership in delhi advised maharashtra leaders to follow alliance rule
आघाडी धर्माचे पालन करा! पक्षनेतृत्वाचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला
Raju Waghmare congress
“… म्हणून काँग्रेसचा हात सोडला”, राजू वाघमारेंचे गंभीर आरोप; म्हणाले, ‘ही तर फक्त सुरुवात’
PM Modi Said Uddhav Thackeray Shivsena is Duplicate
“काँग्रेसबरोबर असलेली शिवसेना नकली, एकनाथ शिंदेच बाळासाहेब ठाकरे यांचे..”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य