नांदेड रेल्वे विभागातील मुदखेड ते परभणी रेल्वे दुहेरीकरणाचे काम पन्नास ते साठ टक्के पूर्ण होत आले आहे.यापूढील काम परभणी ते मनमाड रेल्वे दुहेरीकरण काम सुरु करण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मान्यता लवकरच मिळणार असून येत्या दोन वर्षात रेल्वे दुहेरीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे काही रेल्वे गाडयात वाढ करण्यात येतील असा विश्वास दक्षिण मध्ये रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

दक्षिण मध्ये रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव वार्षीक पाहणी दौऱ्यासाठी बुधवार दि.१२ रोजी औरंगाबदला विशेष रेल्वेने आले होते. रेल्वे स्थानकालगत असलेल्या गॅगमन टूल रुमचे त्यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या गॅगमन कर्मचाऱ्यास रोख पारितोषिक देवून सन्मानीत करुन सर्वाना शुभेच्छा दिल्या. पत्रकारांशी बोलतांना विनोद कुमार यांनी सांगितले की, हा दौरा वार्षीक असून यामध्ये प्रवाशांच्या मागण्या ऐकून त्यांना काय सुविधा देता येतील यावर रेल्वे विभाग भर देता.

अनेक प्रवाशाची मागणी अशी आहे की, रेल्वे गाडयांना थांबे द्या मात्र सहज रेल्वे गाडयांना कुठे थांबे दिले तर त्या लांब पल्यांच्या गाडयाचा वेळा विस्कळीत होतात, यासाठी मग इतर रेल्वे स्थानक थांब्यावरील वेळ कमी करावा लागतो तरी जेथे खरच आवश्यक आहे तेथे थांबे देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.परभणी ते मनमाड रेल्वे दुहेरी करणासाठी रेल्वे बोर्डाला प्रस्ताव पाठविण्यात येईल त्याच बरोबर विद्दूती करणाचे कामही सुरु करण्यात येईल असे विनोद कुमार यांनी सांगितले. मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडी थांबविण्याची मागणी असल्याने तपोनवन एक्सप्रेसला थांबा देण्याचा विचार करण्यात येईल असे अश्वासन त्यांनी लोकप्रतिनिधी वर्मा यांना दिले. विनोदकुमार यांच्या दौऱ्यात नांदेड विभागातील विविध अधिकारी उपस्थित होते.

१० कोटी रुपये खर्च करून रेल्वे स्थानकाचा करणार विकास
मॉडल रेल्वे स्थानक म्हणून घोषना झालेल्या स्थानकाची पुन्हा नव्याने बदल करण्यात येणार आहे. यासाठी परिसरात १०कोटी खर्च करुन मुख्य प्रवेशव्दारापासून मुख्य इमारत पर्यटकांच्या दृष्टिने देखणी करण्यात येणार आहे.महिन्याभरात पार्विâग पासून प्लॅट फॉर्म चा विकास केला जाणार आहे. तसेच स्थानक क्रमांक चारवर पर्यटकांना घेवून येणारी डेक्कन ओडीसी थांबते तेथे सुविधा नसून या स्थानकाचा विकास करुन इंटरनॅशनल स्थानक करण्यात येणार आहे. यासाठी एक कोटी खर्च करण्यात येणार आहे.