News Flash

पासपोर्ट धारकांनो काळजी घ्या; सायबर विभागानं केलं महत्वाचं आवाहन

बनावट पासपोर्टद्वारे फसवणुकीचे प्रकार समोर

सध्याच्या काळात भारतीय पासपोर्टचा साचा (template) डार्कनेटवर आणि इंटरनेटवर काळ्या बाजारात सहजपणे उपलब्ध आहेत. याचा दुरुपयोग करुन लोकांना फसवण्याचे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा बनावट पासपोर्टपासून सावध रहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

सायबर फसवे अशा टेम्लेट्स साधारण ९ ते २३ डॉलर या दरात विकत घेतात आणि त्यामध्ये आवश्यक तो बदल करुन बनावट पासपोर्ट बनवतात आणि त्याचा वापर करून सिमकार्ड विकत घेतात. अशा बनावट ओळखपत्रांचा उपयोग करून विकत घेतली जाणारी सिम कार्ड ही ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यासाठी व अन्य विघातक कृत्यांसाठी वापरली जात असल्याचे समोर आले आहे.

 पासपोर्टच्या स्कॅन कॉपीजना पासवर्ड देऊन सुरक्षित करा

याबाबत महाराष्ट्र सायबर विभागाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, “सावध रहा! तुमचा पासपोर्ट कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नका. तुमच्या पासपोर्टच्या स्कॅन कॉपीजना पासवर्ड देऊन सुरक्षित करा, ज्यामुळे तुमच्याशिवाय अन्य कोणालाही ती फाईल ओपन करता येणार नाही. ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पासपोर्टची प्रत देणार असाल त्या प्रतीवर निळ्या पेनच्या शाईने सही व त्यादिवशीची तारीख पण नमूद करा, असे आवाहनही सायबर विभागाने केले आहे.

खोट्या व खऱ्या पासपोर्टचा फरक जाणून घ्या

१) पासपोर्ट तयार झाल्याची तारीख आणि वैधता संपल्याची तारीख यामध्ये १० वर्षाचा फरक असला पाहिजे. २) पासपोर्टला ३६ किंवा ६० पाने असली पाहिजेत ३) फॉन्टची साईज आणि अलाइनमेंट एकसारखी असली पाहिजे. ४) पासपोर्टवरील भारताची मुद्रा नीट तपासून बघा. ५) पासपोर्टच्या शेवटच्या पानावर पण पासपोर्ट क्रमांक परफोरेटेड स्वरूपात असला पाहिजे ६) जर जुना पासपोर्ट उपलब्ध असल्यास त्यावरील अन्य माहिती जसे की आई वडिलांचे, पती-पत्नीचे नाव नवीन व जुन्या पासपोर्टवर एकच असले पाहिजे. ७) जर पासपोर्ट ३६ पानी असेल तर पण क्र. ३ ते ३४ वर भारताची मुद्रा (अशोक स्तंभ) असला पाहिजे.

जर कोणत्याही नागरिकाची पासपोर्ट संदर्भात किंवा अन्य कोणत्याही प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी लगेच नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंद करावी, तसेच या गुन्ह्यांची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (website) पण द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 2:47 pm

Web Title: passport holders beware the maharasthra cyber department made an important appeal aau 85
Next Stories
1 “पहिले मुंबईत पुढचा शिवसेनेचा महापौर तरी बसवा, मग…”; नितेश राणेंचा शिवसेनेला टोला
2 गगनबावडाकडे जाणाऱ्या मार्गावर दरडीचा भाग कोसळला!
3 औरंगाबाद जिल्ह्यात आज 102 करोनाबाधितांची वाढ ; एकूण संख्या 3 हजार 340 वर
Just Now!
X