News Flash

पेण-खोपोली मार्गावर अपघात, दोन ठार २० जखमी

जखमींवर पेणच्या ग्रामीण रुग्णालयात तसेच अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

पेण खोपोली मार्गावर गागोदे फाटा येथे एसटी बस आणि गॅस वाहून नेणारा टँकर यांच्यात झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी आहेत. रघुनाथ म्हात्रे व दिनेश खेडेकर अशी मृतांची नावे आहेत.  जखमींवर पेणच्या ग्रामीण रुग्णालयात तसेच अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

आज रविवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला . एस टी बस खोपोलीहुन पेणकडे निघाली होती त्याचवेळी समोरून येणारा गॅसवाहक टँकर अनियंत्रित झाला तो थेट एस टी बसला घासत जाऊन पुढे रस्त्यावर कलंडला . यात एस टी बसचा उजव्या बाजूचा पत्रा कापला गेला . आणि बस रस्त्याच्या बाजूला कलंडली . अपघातानंतर या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली . दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 12:21 pm

Web Title: pen khopvali road accident 2 dead nck 90
Next Stories
1 ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक खय्याम रुग्णालयात दाखल
2 बीड : अंबाजोगाईत तीन वाहनांचा विचित्र अपघात; दोन ठार, सहा गंभीर जखमी
3 साकळाई पाणी योजनेसाठी दीपाली सय्यद यांचे आमरण उपोषण
Just Now!
X