20 October 2020

News Flash

नागपुरात औषध व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या

गळफास घेऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

नागपुरातल्या इतवारी भागातील औषध व्यावसायिक विनोद रामाणी यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. विनोद रामाणी हे यशस्वी व्यावसायिक होते.  रविवारच्या दिवशी ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. विनोद रामाणी हे नागपुरातले यशस्वी व्यावसायिक होते. त्यांनी आत्महत्या केल्याने नागपुरातल्या व्यवसाय जगतात खळबळ उडाली आहे. त्यांच्या राहत्या घरीच त्यांनी आत्महत्या केली.

रामाणी यांनी आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांना आर्थिक चणचण भासत होती. त्यामुळे ते निराश झाले होते, नैराश्यातूनच त्यांनी हे कृत्य केलं असं त्यांच्या ओळखीतल्या काही जणांनी म्हटलं आहे. रविवारी दुपारी आम्हाला रमाणी यांच्या घरुन फोन आला, फोनवर आम्हाला रमाणी यांनी गळफास घेतल्याचे सांगण्यात आले. आम्ही घटनास्थळी पोहचलो आणि त्यांचा मृतदेह खाली उतरवला असे पोलिसांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 11:23 am

Web Title: pharmacist vinod ramani commits suicide by hanging himself scj 81
Next Stories
1 मजुरीच्या पैशातील १०१ रुपये मनिऑर्डर करून मुख्यमंत्र्यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
2 लातूरमध्ये फेसबुकवर पोस्ट टाकल्यावरून तरूणाचा खून
3 वृक्षलागवड मोहिमेची १४ जिल्हय़ांमध्ये कासवगती
Just Now!
X