News Flash

तक्रार करायला आलेल्या महिलेचा विनयभंग करणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित

तक्रार करायला आलेल्या महिलेचा विनयभंग करणारा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामनाथ पालवे याला तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

(आरोपी पोलीस, राजेंद्र पालवे)

तक्रार करायला आलेल्या महिलेचा विनयभंग करणारा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामनाथ पालवे याला तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडली होती. पोलिसानेच तक्रार करायला आलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पीडित विवाहितेचे वय ३६ वर्ष असून आरोपी पोलीस हा सहायक उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला १० ऑक्टोबरला आपल्या पतीविरोधात तक्रार देण्यासाठी साने चौकीत आली होती. त्यावेळी राजेंद्र पालवे या पोलिसाने, ‘मी आहे, तुम्ही घाबरू नका असा आधार देत, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला’. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दोन वाजता या पोलिसाने पीडित महिलेच्या मुलाच्या फोनवर फोन केला, आणि आईकडे फोन दे असं त्याला सांगितलं.

मुलाने पीडित महिलेकडे फोन दिल्यावर पोलिसाने त्यांची विचारपूस करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि थेट ‘आय लव्ह यू’ म्हणाला. दुसऱ्यादिवशी त्याच्याविरोधात पीडित महिलेने चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पिंपरी चिंचवड आयुक्तालयात दहा तारखेला चिखली पोलीस स्टेशनची स्थापना झाली. त्यानंतर हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2018 3:20 pm

Web Title: police who molested women suspended
Next Stories
1 प्रेरणादायी : आठ वर्षांपासून रुग्णांना मोफत जेवणाचे डबे पोहचवणारी ‘अन्नपूर्णा’
2 बारामतीमधले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दादा साळुंखे यांची हत्या
3 अनियंत्रित वापरामुळेच पाणीपुरवठा बंद
Just Now!
X