आम्ही भाजपा विरोधातल्या सगळ्या पक्षांना आवाहन करीत आहोत. जर आघाडी करायची असेल तर लोकसभेच्या दोन जागा धनगर, दोन जागा माळी आणि दोन जागा भटक्या विमुक्तांना देणार असतील तर आम्ही एकत्र येण्यास तयार आहोत असे प्रकाश आंबेकडर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. पुरोगामी पक्ष म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर आघाडी करायला आमचा नकार नसून काही अटींवर एकत्र येऊ शकतो असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी आघाडी करण्याचे संकेत दिले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर भूमिका मांडली.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून राज्यातील वंचित संघटनांना सहभागी करून आगामी काळात काम केले जाणार आहे. येत्या २७ तारखेपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर भाजप विषयी नागरिकामध्ये प्रचंड रोष असून नागरिक पर्याय म्हणून काँग्रेसकडे पाहत असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांच्या एकहाती कारभारला जनता स्वीरकारणार नसून जनता दुसरा पर्याय पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी फुले पगडी घालण्या बाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चेना उधाण आले आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की,शरद पवार यांनी फुलेंनी पगडी स्वीकारली त्याचा आनंद आहे. पण आमचा विरोध पेशवाईला त्यामुळे पगडीलाही विरोधच आहे असे त्यांनी सांगितले. शरद पवारांना आम्ही पुरोगामी समजतो पण त्यांच्या काही भूमिका प्रतिगामी त्या त्यांनी सोडाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माझ्या वकिलीचा हसका कसा दाखवतो पहा : प्रकाश आंबेडकर
एल्गार परिषद आणि भिमा कोरेगाव प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडील काही कागदपत्रामध्ये तुमचं नाव असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यावर ते म्हणाले की, पोलिसांनी नोटीस बजवल्यास मीच त्यांना नोटीस बजवणार असून माझ्या वकिलीचा कसा हिसका दाखवतो पहा.

गौरी लंकेश हत्येमागील मास्टर माईंड शोधा : प्रकाश आंबेडकर
नरेंद्र दाभोलकर, पानसरे यांचे मारेकरी अद्याप पर्यंत सापडले नाहीत. यातून सरकारचा कारभार लक्षात येत असून गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याला आता पकडणे म्हणजे सत्ताधारी पक्षाविरोधात वातवारण झाल्याने एखादा आरोपी यांनी पकडला आहे. स्वतःला वाचवण्यासाठी ही अटक केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या सर्व घडामोडी लक्षात घेता. या मागील मास्टर माईंड समोर आणला पाहिजे.