News Flash

सर्व माध्यमे मोदी धार्जिणी

प्रणिती शिंदे यांचे पंतप्रधानांसह माध्यमांवर टीकास्त्र

प्रणिती शिंदे यांचे पंतप्रधानांसह माध्यमांवर टीकास्त्र

पंढरपूर : सध्या सर्व माध्यमे ही मोदी धार्जिणी झाली असून मोदींनी त्यांना विकत घेतले आहे. त्यामुळे सत्य जनतेसमोर येत नसल्याचे सांगत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी सर्व माध्यमांवर टीका केली. पंढरपूर तालुक्यातील कोपरा सभेत त्या बोलत होत्या.

सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून पुन्हा एकदा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यांच्या प्रचारासाठी प्रणिती शिंदे पंढरपुरात आल्या होत्या. या वेळी कासेगाव येथील एका कोपरा सभेत त्यांनी माध्यमांवरच तोफ डागली.

शिंदे म्हणाल्या, की सध्या देशातील सर्व माध्यमे ही मोदी धार्जिणी झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना विकत घेतले आहे. त्यामुळे सत्य जगासमोर येत नाही. गेल्या निवडणुकीत मोदींनी असाच ‘समाज माध्यमा’चा वापर केला होता. त्याचा वापर करून खोटी आश्वासने दिली,पण ती पूर्ण केली  नाहीत.

‘नीरव मोदीच्या अटकेचा राजकीय फायदा’

मोदी सरकारकडून कोणाला फायदा झाला आहे का? असा उपस्थितांना प्रश्न करत आ.शिंदे म्हणाल्या, की त्यांचा फायदा केवळ नीरव मोदी यांनाच झाला. आता निवडणुकीच्या तोंडावर नीरव मोदीला अटक केल्याने त्याचा राजकीय फायदा हे सरकार घेणार आहे. गेल्या निवडणुकीत शिंदे मतदार संघातील अनेक मतदारांपर्यंत पोहोचले नाहीत. तसेच, मोदी लाट यामुळे त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 11:59 pm

Web Title: praniti shinde criticized on the media along with pm narendra modi
Next Stories
1 कणकवलीच्या छायाचित्रकाराचे जगभरात कौतुक
2 धवलसिंह मोहितेंची शिवसेनेतून हकालपट्टी, शरद पवारांची घेतली होती भेट
3 ‘पार्थ’सुद्धा ‘मावळ’णार, भाजपाचा राष्ट्रवादी काँग्रेसवर व्यंगचित्रातून निशाणा
Just Now!
X