कल्पकता आणि सामाजिक दायित्वासाठी अग्रेसर असणाऱ्या चंद्रपूर येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने करोना संसर्गाच्या काळात कार्यालयीन आणि घरी वापरासाठी उपयोगी ठरणारे बांबूचे सॅनिटायझर स्टँड तयार केले आहे. लवकरच बाजारात हे स्टॅन्ड जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातून बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचे कार्य सुरू आहे. मोठ्या प्रमाणात कौशल्य आधारित रोजगार देणाऱ्या या संशोधन केंद्रातून अनेकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कौशल्य प्राप्त झाले आहे. या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे बांबूपासून सामान्य माणसाच्या जीवनात उपयोगात येणाऱ्या स्वस्त आणि आवश्यक टिकाऊ वस्तू तयार करण्याची प्रक्रिया होय. या केंद्रातून आत्तापर्यंत बांबूपासून सायकल, तिरंगी झेंडा, बांबूची तलवार, बांबूचे घरगुती वापराचे सोफासेट, टेबल-खुर्च्या याशिवाय या केंद्राची सुप्रसिद्ध बांबूची कव्हर असणारी डायरी अशा वस्तू बनवण्यात आल्या आहेत.

easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
women hostel building Nanded
नांदेडमधील महिला वसतिगृहाची वास्तू बनली भाजपचे प्रवेश केंद्र !
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
‘आयसर’च्या प्रवेष परीक्षेची तारीख जाहीर; अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू

या केंद्रामार्फत बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याच्या स्पर्धा देखील घेतल्या जातात. दरवर्षी या ठिकाणी बांबूपासून गणेश मूर्तीची निर्मिती, बांबूपासून राख्या तयार करणे अशा विविध उपक्रमाला राबविण्यात येते.

मेकॅनिकल इंजिनियर आणि भारतीय वनसेवेतील सनदी अधिकारी असणारे राहुल पाटील यांच्या कल्पकतेतून याठिकाणी विविध प्रयोग केले जातात. त्यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणच्या बांबूपासून वस्तू बनविण्याच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये देखील विद्यार्थ्यांकडून अनेक वस्तू तयार केल्या जातात. याठिकाणी पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या योगिता साठवणे यांच्या कल्पनेतून बांबूपासून सॅनिटायझर स्टँड तयार करण्याची कल्पना पुढे आली. या ठिकाणी डिझायनर म्हणून काम करणाऱ्या किशोर गायकवाड, हस्तशिल्प निर्देशक आणि बांबू कारागीर राजू हजारे यांनी या कल्पनेला राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनात आकार दिला. तसेच सुशील मंतावर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या नियोजनात काम करण्यात आले. बांबू स्टॅन्ड हा गरजेचा विषय असून लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.