आपल्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करत असलेल्या धरमतर खाडी प्रकल्पबाधितांनी आज रायगडचे नवे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. परंतु प्रकल्पग्रस्त आपल्या मागण्यावर ठाम राहिले व आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.
धरमतर खाडीकिनाऱ्यावरील जेएसडब्ल्यू इस्पात व पी. एन. पी. कंपनी या प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या मच्छीमार सहकारी संस्था व पारंपरिक मच्छीमार कुटुंबीयांना आíथक नुकसानभरपाई मिळावी व त्यांचे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी धरमतर खाडी प्रकल्पबाधित शेतकरी व कोळीबांधवांनी ११ फेब्रुवारीपासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आंदोलनाचा आज अकरावा दिवस असून आज हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इरादा धरमतर खाडी प्रकल्पबाधित पेण, अलिबाग मच्छीमार संघर्ष समितीचे अध्यक्ष कामगार नेते श्याम म्हात्रे यांनी व्यक्त केला होता. त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली होती. त्यामुळे आज पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. अखेर जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी आंदोलकांना चच्रेला बोलावले. श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व आपल म्हणणे मांडले.आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, अशी आमचीदेखील इच्छा आहे. याबाबतचे सर्व निर्णय शासनपातळीवर घ्यावे लागणार आहेत. आपण आपले आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवा. यातून मार्ग काढण्यासाठी मीमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घालूनदेण्याचा प्रयत्न करीन, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.जिल्हाधिकारी नवीन आहेत. त्यांचा आज पहिलाच दिवस आहे. त्यांना वेळ मिळावा म्हणून आम्ही शांततेने आंदोलन करणार आहोत. परंतु मागण्या पूर्ण होईपर्यन्त धरमतर खाडी प्रकल्पग्रस्त आंदोलन सुरूच ठेवणार. दोन दिवसांत शासनाने ठोस निर्णय घेतला नाही तर मात्र आंदोलन तीव्र करण्यात येईल, असे श्याम म्हात्रे यांनी सांगितले.सुमारे ३०० ते ४०० स्त्री-पुरुष आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले ११ दिवस ठाण मांडून आहेत. पीएनपी मेरिटाइम सíव्हसेस आणि निप्पॉन डेन्रो (आत्ताची जेएसडब्ल्यू)या कंपन्यांच्या मालवाहू
बोटींमुळे धरमतर खाडीतील पारंपरिक मच्छीमारी करणाऱ्यांचा व्यवसाय बंद पडला आहे. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यांना नुकसानभरपाई व अन्य सुविधा मिळाव्यात यासाठी कामगार नेते श्याम म्हात्रे व माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक वष्रे लढा सुरू आहे.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Kolhapur jobs 2024 Jilhadhikari Karyalay hiring
Kolhapur jobs 2024 : कोल्हापूरकरांनो, जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची संधी! अधिक माहिती पाहा