यंदाच्या हंगामात पुरहानीत सापडलेल्या कोकणातील व्यापाऱ्यांसाठी ६७ कोटी रुपयांचा प्रस्ताव असून येत्या दोन-चार दिवसात व्यापाऱ्यांच्या खात्यावर भरपाई जमा होईल असा विश्वास राज्याचे माजी गृह, वित्त, नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

आपण राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याशी भेट व चर्चाई केली आहे असे केसरकर म्हणाले. पुरहानीत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसानी झाले होते, यावर आपण मंत्री परिषद मध्ये नुकसानभरपाई मिळावी म्हणून मागणी केली होती. सरकारी भरपाईसाठी सर्वेक्षणदेखील झाले होते. या व्यापाऱ्यांसाठी ६७ कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे, येत्या दोन-चार दिवसांत व्यापाऱ्यांच्या खात्यावर जमा नुकसानभरपाई जमा होईल असे केसरकर म्हणाले.

पूरहानी काळात शेतीचे नुकसान झाले होते या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी किंवा हेक्टरी २० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय झाला झाला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत कसणारा शेतकरी आणि सातबारावर अनेक नावे असल्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्याला भरपाई मिळत नाही याबाबतही लक्ष वेधले होते शेती कसणाऱ्याचे प्रतिज्ञापत्र घेऊन भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे असे ते म्हणाले.

खार बंधारे देखील नादुरुस्त झाले होते,त्याना विशेष मदत देण्यात यावी अशी मागणी केली होती पण प्रचलित निर्णयानुसार बंधारे दुरुस्तीसाठी मदत दिली जाईल असे केसरकर म्हणाले. मच्छीमारांच्या जाळी चे नुकसान झाले आहे ती भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

मच्छीमार वादळ काळात समुद्रात गेले नाहीत, त्यांना भरपाई दिली जावी याकडे लक्ष वेधण्यात आले आहे त्याचा जीआर काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.  पर्यटकांनी बुकिंग केले पण वादळ व अतिवृष्टीमुळे पर्यटक आले नाहीत  त्यामुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत आला , त्यांना भरपाई देण्याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

कयार वादळ व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह मच्छीमार, बागायतदार यांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले असल्याचे ते म्हणाले कोकणातील फळझाड वृक्षांच्या वयाच्या विचाराने भरपाई देण्यात यावी याकडेदेखील लक्ष वेधले आहे झाडं सुमारे पन्नास वर्षांची पेक्षा जास्त वर्ष जगतात यामुळे सरसकट भरपाई नको प्रत्यक्षात नुकसानभरपाई दिली जावी यासाठी लक्ष वेधल्याचे ते म्हणाले.

अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे प्रचलित निर्णयानुसार २०हजार रुपयांची प्रतिहेक्टरी भरपाई मिळावी. ओला दुष्काळ सरकार निर्माण झाल्यानंतर जाहीर करण्याबाबत निर्णय होईल तोपर्यंत जुन्या दरानेच भरपाई दिली जावी अशी मागणी केली आहे, असे केसरकर म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे शेतकरी, मच्छीमार आणि व्यापाऱ्यांच्या नुकसानभरपाई बाबतीत आग्रही आहेत. त्यामुळे सर्वच घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.