27 May 2020

News Flash

‘बेळगांवी’ नामांतराचे कोल्हापुरात पडसाद

बेळगावचे बेळगांवी असे नामांतर करण्यात आल्याने या नामांतराचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटू लागले आहेत. या नामांतराचा मराठा महासंघ आणि िहदू एकता आंदोलनच्या वतीने तीव्र निषेध

| November 4, 2014 01:10 am

बेळगावचे बेळगांवी असे नामांतर करण्यात आल्याने या नामांतराचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटू लागले आहेत. या नामांतराचा मराठा महासंघ आणि िहदू एकता आंदोलनच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
हजारो वष्रे परंपरा असलेले ‘बेळगाव’ हे नाव आपल्या इतिहासाशी जोडले गेलेले आहे. परंतु मराठाद्वेष्टी मराठी भाषकांच्या जखमेवर मीठ चोळण्याच्या प्रकाराचा जाहीर निषेध मराठा महासंघाच्या पदाधिकारी बठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक होते. लवकरच सभासद नोंदणी अभियान २०१४ राबविण्याचा निर्णय व मराठा वार्षकि दिनदíशका प्रकाशित करण्याचे ठरले. या वेळी डी. जी. पाटील, शंकरराव शेळके, डॉ. शिवाजीराव हिलगे, दिलीपराव पाटील, राजदीप सुर्वे, चंद्रकांत चव्हाण, उत्तम जाधव, सुरेंद्र घोरपडे, संदीप पाटील, प्रकाश पाटील, आप्पा मिसाळ यांचेसह तालुकाध्यक्ष, शाखा अध्यक्षांसह जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
िहदू एकता आंदोलन संघटनेच्या कार्यालयात झालेल्या बठकीत कर्नाटक सरकारकडून भाषा स्वातंत्र्यावर होत असलेल्या हल्लय़ाचा निषेध करण्यात आला. या वेळी बेळगाव िहदू एकता शाखाप्रमुख शिवाजी सांबरेकर, ग्रामीण विभाग प्रमुख दत्तात्रय पाटील, सतीश पाटील, भालचंद्र उचगावकर, कृष्णा गुरव, भाऊ जांभळे, कोल्हापूर िहदू एकताचे प्रांत सरचिटणीस लालासो गायकवाड, जिल्हाप्रमुख चंद्रकांत बराले, कार्याध्यक्ष िहदुराव शेळके, शहरप्रमुख जयदीप शेळके, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी खराडे आदी उपस्थित होते.
सीमाप्रश्न गेली कित्येक वष्रे न्यायप्रविष्ट आहे असे असताना बेळगावचे ‘बेळगावी’ असे नामकरण करणे, तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राची सीमा सरहद दाखविणारा महामार्गावरील येळ्ळूर गावी असलेला नामफलक हजारो पोलिसांच्या मदतीने व जेसीबी यंत्राच्या साहाय्याने उखडून टाकण्यात आला. या दोन्ही गोष्टी दबावतंत्राने चालवल्या गेल्या. हा एक षडयंत्राचाच भाग आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सीमाभागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र सरकारने सीमाबांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजेत. या पुढेही सीमाबांधवांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात िहदू एकता संघटना ठामपणे उभी राहील, असे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2014 1:10 am

Web Title: protest in kolhapur against name change of belgaum
Next Stories
1 सुरेश वाडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
2 जवखेडे हत्याकांड निषेध मोर्चाला जळगावमध्ये हिंसक वळण
3 जायकवाडीस पाणी मिळू शकते, पण..!
Just Now!
X