राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांनी चार दिवसांपूर्वी उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांना मारहाण केली होती. त्याच्या निषेधार्थ शनिवारी कोकण विभागातील महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी लेखणी बंद आंदोलन केले. त्यामुळे रायगड जिल्ह्य़ातील महसूल कार्यालयांमधील कामकाज ठप्प झाले होते. रिलायन्स गॅसवाहिनींच्या मुद्दय़ावरून कर्जतचे आमदार लाड यांनी उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांना भर सभेत मारहाण केली होती. लाड यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. शनिवारी संपूर्ण कोकणातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले.
- रायगड जिल्ह्य़ातील कोतवालापासून उपजिल्हाधिकारी पदापर्यंत जवळपास दीड हजार अधिकारी- कर्मचारी या आंदोलनात सहभागी
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 21, 2016 12:36 am