News Flash

पुण्यातील व्यापाऱ्याची गोळ्या घालून हत्या

मृतदेह लोणंद जवळील पाडेगाव हद्दीतील कॅनॉलजवळ आढळला

(संग्रहित छायाचित्र)

पुणे येथील व्यापारी चंदन शेवानी यांची लोणंद जवळील पाडेगाव (ता. खंडाळा) च्या हद्दीमध्ये गोळ्या घालून हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा मृतदेह पाडेगाव येथील कॅनॉल जवळ रात्रीच्या वेळी आणून टाकत खूनी पसार झाले आहेत.लोणंद पोलीसात या गुन्हयाची नोंद झाली असून खूनाचे गुढ उकलण्यासाठी पोलिस यंत्रणा कार्यरत झाली आहे.

आज सकाळीलोणंद जवळील पाडेगाव (ता. खंडाळा) च्या हद्दीतील कॅनॉल लगत असणाऱ्या कच्या रस्त्यावर अज्ञात मृतदेह असल्याची माहिती लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संतोष चौधरी यांना मिळाली.त्याप्रमाणे त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळ्या घालून अज्ञाताचा खून करून मृतदेह पाडेगाव येथील कॅनॉल जवळ रात्रीच्या वेळी आणून टाकत खूनी पसार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

मृतदेहावर जखमा असून गोळ्या घालून खून करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुणे येथील व्यापारी चंदन शेवानी यांचा हा मृतदेह असल्याची माहिती समोर आली आहे. लोणंद पोलीसात याप्रकरणी गुन्हयाची नोंद झाली असुन, पुढील तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2020 5:16 pm

Web Title: pune businessman shot dead msr 87
Next Stories
1 वाघांमध्ये संघर्ष वाढणार, मादींसाठी नरांमध्ये ‘टशन’!
2 उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात १३ जिल्ह्यांना मिळाले नाही स्थान !
3 मॅरेथॉनमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; पाच जण जखमी
Just Now!
X