सावंतवाडी-बांदा या महामार्गावर माजगाव मशिदीजवळील हायवेच्या दोन्ही बाजूंना भर दुपारी अग्निप्रलय झाला. यामुळे कनकी बांबूंनीही पेट घेतला. त्यामुळे मार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला. पोलीस व अग्निशमन दल दाखल झाल्यावर अग्निप्रलयावर ताबा मिळविला गेला.
माजगावच्या या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी एकाच वेळी आग लागली. त्यामुळे जिवंत कनकी बांबूंनी पेट घेतला. कनकीचे बांबू रस्त्यावर आडवे झाले. त्यामुळे दोन्ही बाजूंनी होणारी वाहतूक थांबली. सावंतवाडी पोलीस ठाण्यातून हवालदार सचिन सावंत यांनी धाव घेतली, तर नगरपालिकेचा अग्निशमन बंबही धावला. या बंबाने अग्निवलयावर मात केली गेली. कनकी बांबूंनी पेट घेतल्याने उशिरापर्यंत अग्निप्रलय शांत होत नव्हता. दरम्यान, सरपंच आबा सावंतदेखील घटनास्थळी धावले. या मार्गावर धावणाऱ्या बसेस, पर्यटकांच्या गाडय़ा व दुचाकी वाहने रोखली गेली. रस्त्याच्या दुतर्फा अग्निप्रलय व धुराने तांडव केले होते. मात्र अग्निशमन बंब दाखल झाल्यावर विस्तवावर पाणी मारले गेल्याने अग्निप्रलय थंडावला.
या अग्निप्रलयाचे कारण समजू शकले नाही. मात्र भर दुपारी हा अग्निप्रलय झाल्याने सर्वाचीच धावपळ उडाली. या रस्त्यावरून मुंबई-गोवा महामार्गावर धावणाऱ्या वाहनचालकांचा मात्र भर दुपारी खेळखंडोबा उडाला होता. या अग्निप्रलयामुळे मोठी हानी झाली नाही असे पोलिसांनी सांगितले.

tanker overturned, tanker overturned,
बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर परिसरात अल्कोहोलचा टँकर उलटला
mumbai pune expressway marathi news
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांचा वेग वाढणार, बोरघाटात आता ताशी ६० किमी वेगाने वाहने धावणार
mumbai nashik highway, traffic route changes
मुंबई नाशिक महामार्गावर उद्या मोठे वाहतूक बदल
accident, Mumbai Nashik highway,
मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू