06 July 2020

News Flash

रायगड क्रिकेट चाचणी १ मार्चपासून

स्पध्रेचे नियोजन सचिन मते, किरीट पाटील, रमजान पेंढारी करीत आहेत.

रायगड जिल्हा किकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेली  खुल्या गटाची जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा १ मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पध्रेतील खेळाडूंच्या कामगिरीचा विचार करून रायगड संघ निवडण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली.

ही स्पर्धा ‘अ’, ‘ब’, ‘क’ अशा तेीन गटात खेळवली जाणार आहे. स्पध्रेतील सामने ४५ षटकांचे असतील. ‘अ’ व ‘ब’ गटासाठी ५००० रुपये तर  ‘क’ गटासाठी ४००० रुपये  शुल्क आकारण्यात आले आहे.

स्पध्रेचे नियोजन सचिन मते, किरीट पाटील, रमजान पेंढारी करीत आहेत. अधिक माहितीसाठी चंद्रकांत मते -९८२२८३६४४२, प्रकाश पावसकर- ९४२३३७७६४६, अनिरुद्ध पाटील- ९०२१६५६५५५, जयंत नाईक- ९५६१०९९७३५, विवेक बहुतुले -९४२११५८३००, यांच्याशी संपर्क साधावा.

स्पध्रेची माहिती देण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता पेण नगरपरिषद इमारत, पेण येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. स्पध्रेत सहभागी होणाऱ्या संघाच्या एका प्रतिनिधीने या सभेला हजर राहावे.

या सभेसाठी येणाऱ्या प्रतिनिधींनी आपल्या संघातील २० खेळाडूंच्या नावांची यादी, त्यांचे फोटो, प्रवेश शुल्क सोबत आणावे असे आवाहन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2016 2:30 am

Web Title: raigad cricket competition
टॅग Raigad
Next Stories
1 सावरकरांना नजरकैदेत ठेवण्याविषयीची कारणे खुली करा
2 नायिकाप्रधान चित्रपटांची यंदाही चलती
3 परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाची यंदाही २०० कोटींवर बोळवण
Just Now!
X