02 March 2021

News Flash

त्या मंत्र्यांची कपडे फाडा अन् तुडवून तुडवून मारा – राजू शेट्टी

गरज पडल्यास कापूस-सोयाबीनला भाव न देणाऱ्या मंत्र्यांना पेटवा

खासदार राजू शेट्टी

गावात येऊन खोटी आश्वासनं देणाऱ्या मंत्र्यांची कपडे फाडून तुडवून तुडवून मारा. तुम्हीच त्यांना मारलं पाहिजे असे वादग्रस्त वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. अकोल्यातील निंबा गावात आयोजित एका सभेत राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांसमोर हे वादग्रस्त विधान केलं आहे. राजू शेट्टी सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.

राजू शेट्टी यांनी वादग्रस्त वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे. खोटी अश्वासने देणाऱ्या मंत्र्यांना आता मारलं पाहिजे. त्यासाठी मी कोल्हापूरमधून माणसं पाठवेन याची वाट पाहू नका. तुम्हालाच त्यांना मारायचं आहे. सरकार आपलं देणं लागतं. आम्ही बँकेचं देणं देऊ शकत नाही. मग आम्ही मंत्र्यांना ठोकलं तर बिघडलं कुठं?’ असा प्रश्नही उपस्थित केला.

शेट्टी यांच्यापाठोपाठ त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘यापुढे एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करायची गरज नाही. गरज पडल्यास कापूस-सोयाबीनला भाव न देणाऱ्या मंत्र्यांना पेटवा, खासदार-आमदारांना ठोका, पण आत्महत्या करू नका’, असं सांगतानाच ‘शेट्टींनी सांगितलं तर एखाद्या मंत्र्याला भोसकायलाही कमी करणार नाही’, असं वक्तव्य तुपकर यांनी करून खळबळ उडवून दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 3:51 pm

Web Title: raju shettys controversial statement in akola
Next Stories
1 ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या या ५१ शाखा होणार बंद
2 प्रतापगडावरून उडी मारून महिलेची आत्महत्या
3 “कोरेगाव भीमा लढाईच्यावेळी महार रेजिमेंटच नव्हती”
Just Now!
X