राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाव्दारे आयोजित ५४ व्या अंतिम हौशी मराठी नाटय़ स्पध्रेत येथील ‘नवोदिता’ने सादर केलेल्या ‘ध्यानी मनी’ या नाटकासाठी नूतन धवने यांना सवरेकृष्ट अभिनयाचे रौप्यपदक जाहीर झाले आहे. ५३ व्या अंतिम हौशी मराठी नाटय़ स्पध्रेतही नूतन धवने अभिनय रौप्यपदकाच्या मानकरी ठरल्या होत्या. सलग दोन वर्ष नूतन धवने या अंतिम नाटय़ स्पध्रेत रौप्यपदकाच्या मानकरी ठरल्या आहे. ‘ध्यानी मनी’ने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अंतिम नाटय़ स्पध्रेतही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. धनंजय धनगर आणि गायत्री देशपांडे यांना अभिनयाचे उत्तेजनार्थ पुरस्कार, तर सवरेत्कृष्ट नेपथ्याचा तृतीय पुरस्कार सतीश काळबांडे यांना जाहीर झाला आहे. प्रशांत दळवी लिखित या नाटकाचे दिग्दर्शन प्रशांत कक्कड यांनी केले असून निर्मिती प्रा. डॉ. जयश्री कापसे-गांवडे, अजय धवने, आशिष अम्बाडे यांची आहे. नेपथ्य- सतीश काळबांडे, प्रकाश योजना- हेमंत गुहे, संगीत- राहुल मेडपल्लीवार, रंगभूषा-वेशभूषा- शीतल बैस, तर रंगमंच व्यवस्था कुणाल ढोरे, अंकुश दारव्हेकर, धीरज भट, रितेश चौधरी आदींची आहे. नवोदिताच्या या यशाबद्दल सांस्कृतिक वर्तुळात अभिनंदन करण्यात येत आहे.