11 July 2020

News Flash

गाझातील नरसंहाराविरुद्ध मुस्लीम बांधवांचा मोर्चा

इस्त्रायलकडून गाझामध्ये सुरू असलेल्या नरसंहाराविरोधात परभणीत मुस्लीम बांधवांनी मोठा मोर्चा काढला. मोर्चात मुफ्ती व उलेमा धर्मगुरूंसह मुस्लीम बांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनी परभणी

| August 24, 2014 01:05 am

इस्त्रायलकडून गाझामध्ये सुरू असलेल्या नरसंहाराविरोधात परभणीत मुस्लीम बांधवांनी मोठा मोर्चा काढला. मोर्चात मुफ्ती व उलेमा धर्मगुरूंसह मुस्लीम बांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनी परभणी पीपल्स बँकेसमोर मोर्चा अडवला.
मागील दोन महिन्यांपासून इस्त्रायलकडून गाझामध्ये सुरू असलेल्या बॉम्बहल्ल्यात निरपराध मुस्लिमांना प्राण गमवावे लागत आहेत. मानवतेच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने या विरोधात योग्य भूमिका घ्यावी, अशी मागणी मोहम्मदिया सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे सय्यद अब्दुल कादर यांनी करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लीम बांधवांचा मोर्चा काढला. दुपारच्या नमाजानंतर मोर्चा ईदगाह मदानावरून निघाला. मोर्चामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2014 1:05 am

Web Title: rally of muslim brothers in issue of gaza
टॅग Parbhani,Rally
Next Stories
1 डॉ. सुषमा पाटीलसह तीन डॉक्टरांना अटक
2 वसंतदादा पतसंस्थेत १ कोटीचा अपहार
3 अर्बन बँकेच्या मल्टिस्टेट दर्जावर शिक्कामोर्तब!
Just Now!
X