25 September 2020

News Flash

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला अटक

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी संशयित आरोपीला सातारा जिल्ह्य़ातील हायरे गावातून अटक करण्यात आली आहे.

| April 12, 2015 05:30 am

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी संशयित आरोपीला सातारा जिल्ह्य़ातील हायरे गावातून अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीने महाड शहर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
बारावीच्या परीक्षेसाठी महाड येथे आलेली अल्पवयीन मुलगी संध्याकाळपर्यंत घरी न आल्याने पीडित मुलीच्या आई व तिच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. गावाजवळच राहणाऱ्या भारत तानाजी चव्हाण यानेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करून मुलीचा शोध सुरू केला. त्यावेळी दोघेही सातारा तालुक्यातील हायरे गावात आढळून आले.
यानंतर भारत याला अटक करण्यात आली असून, त्याच्या विरोधात भादंवी ३७६ आणि बालकांचे लंगिक शोषण विरोधी कायद्याअन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 5:30 am

Web Title: rapist molested minor arrested
टॅग Rapist
Next Stories
1 खंडपीठाच्या मागणीसाठी कोल्हापुरात न्यायालयाला टाळे
2 सांगली जिल्ह्यात पावसाची हजेरी
3 जिल्ह्य़ात पुन्हा ‘अवकाळी’चा फेरा
Just Now!
X