गंगाखेड शुगर फॅक्टरीचे चेअरमन तसेच उद्योजक रत्नाकर गुट्टे आणि वाद यांचं नातं जवळचं आहे. कारण आता त्यांच्या पत्नी सुदामती गुट्टे यांनीच तक्रार त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. रत्नाकर गुट्टे छळतात, मारहाण करतात घटस्फोट मागतात अशी तक्रार सुदामती गुट्टे यांनी केली आहे. या तक्रारीनंतर रत्नाकर गुट्टेंच्या विरोधात कलम ४९८ अन्वये शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गिरीराज शेळके यांनी ही माहिती दिली. रत्नाकर गुट्टे हे गेल्या काही दिवसांपासून सुदामती गुट्टे यांच्याकडे घटस्फोट मागत असल्याचे सांगण्यात आले. सुदामती गुट्टे यांनी यासंदर्भातली रितसर तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी रत्नाकर गुट्टे यांच्यासह एकूण सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नाकर गुट्टेंवर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत ही बाब उघड आहे. या प्रकरणातील फिर्यादी म्हणजेच रत्नाकर गुट्टे यांच्या पत्नी द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर सिनेमाचे दिग्दर्शक विजय गुट्टे यांच्या आई आहेत. सुदामती गुट्टे यांनी केलेल्या तक्रारीत रत्नाकर गुट्टे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. रत्नाकर गुट्टे हे बाहेरख्याली असल्याचे सांगत, रात्री अपरात्री ते परस्त्रियांना घरी घेऊन येतात. मला घराबाहेर काढण्याची धमकी देतात. तू मला पसंत नाही असे सांगतात असेही सुदामती गुट्टे यांनी तक्रारीत म्हटले आहे. एवढंच नाही तर रत्नाकर गुट्टे आणि त्यांचा भाऊ तसेच इतर सहकारी मला पिस्तुलाचा धाक दाखवतात असाही आरोप सुदामती यांनी केला आहे.

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
wardha lok sabha seat, MP ramdas tadas , MP ramdas tadas s Son Pankaj Tadas, Pankaj Tadas defend his side, over Estranged Wife Pooja s Dispute, sushma andhare, pooja tadas, bjp, maha vikas aghadi, wardh politics, politics news
“सुषमा अंधारे यांनी माझी बाजू ऐकली असती तर विरोधात बोलल्या नसत्या,” पंकज तडस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
latur lok sabha marathi news, shivraj patil chakurkar latur latest news in marathi
शिवराज पाटील यांच्या ‘देवघरा’ बाहेरील गर्दी वाढली

दोन महिन्यांपूर्वीच रत्नाकर गुट्टे हे शेतकर्‍यांच्या नावावर पैसे उचलल्याच्या कारणावरून अडचणीत आले होते. त्यापाठोपाठ दस्तुरखुद्द त्यांच्या पत्नीनेच आता त्यांच्याविरोधात लेखी तक्रार देऊन गुन्हा दाखल केल्याने गुट्टे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.