News Flash

वसई-विरारमध्ये करोनामुळे होळीचा बेरंग

रंग, गुलाल, पिचकारी, फुगे आदी साहित्य खरेदीकडे ग्राहकांची पाठ

रंग, गुलाल, पिचकारी, फुगे आदी साहित्य खरेदीकडे ग्राहकांची पाठ

वसई: दरवर्षी मोठय़ा उत्साहात होळीचा उत्सव साजरा केला जातो. परंतु यंदाच्या वर्षी पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने होळी साजरी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे होळी निमित्ताने रंग, पिचकारी व इतर साहित्याची खरेदीकरण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.

वसई विरार शहरात होळी व धुळवड साजरी केली जाते. या सणाच्या निमित्ताने होळी खेळण्यासाठी लागणारे रंग, फुगे, पिचकाऱ्या व इतर साहित्य विक्रीसाठी बाजारात येतात. याची मोठय़ा प्रमाणात खरेदी विक्री होत असते. परंतु

यावर्षी करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी शासनाने होळी व धुळवड साजरी करण्यावर  बंदी घालण्यात आली. याचा विपरीत परिणाम होळीच्या निमित्ताने साहित्य विक्रीसाठी आणणाऱ्या  व्यवसायिकांवर झाला आहे.

होळीनिमित्त लागणारा गुलाल , रंग व इतर साहित्य विक्रीसाठी आणले आहे. होळीच्या सुरवातीच्या चार पाच दिवस आधीपासूनच खरेदीसाठी ग्राहक येण्यास सुरुवात होत असते.  परंतु  यंदा प्रशासनाने उपहारगृह, रिसॉर्ट, सार्वजनिक ठिकाणी होळी खेळण्यासाठी मनाई केली असल्याने  रंग खरेदी करण्यासाठी ग्राहक येत नसल्याचे विक्रेते रमन सोलंकी यांनी सांगितले आहे. दरवर्षी या दोन दिवसात या साहित्य विक्रीतून चांगला फायदा होत असतो यावर्षी ग्राहकच नसल्याने विकत आणलेला माल तसाच पडून राहिल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.विशेषत: लहान मुले या सर्व साहित्याची खरेदी करण्यासाठी येत असतात आता तर शाळाही बंद झाल्या आहेत. त्यामुळे तेही याठिकाणी फिरकत नाहीत.  करोनाची दुसरी लाट आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. यासाठी नागरिकांनी ही स्वत: ची काळजी घेतली पाहिजे. याआधी मित्र परिवार व कुटुंबातील सदस्य यांच्या सोबत होळी खेळत होतो. आता करोना आहे त्यामुळे एक वर्ष होळी नाही खेळली तरी चालेल परंतु आपला परिवार व इतर नागरिक सुरक्षित राहिले पाहिजे. यासाठी यंदा होळी न खेळण्याचा निर्णय घेतला असल्याचे नागरिक नारायण मिश्रा यांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 12:04 am

Web Title: restrictions on holi celebrations in vasai virar due to coronavirus zws 70
Next Stories
1 पालघर जिल्ह्य़ात ५ एप्रिलपासून निर्बंध
2 Coronavirus : पालघर करोनाच्या विळख्यात
3 ‘एक गाव एक होळी’ची परंपरा कायम
Just Now!
X