News Flash

एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर

प्रवेशपत्र वेबसाईटवर उपलब्ध

प्रातिनिधीक छायाचित्र

एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.

सुप्रीम कोर्टानं सीईटी घेण्यास अधिकृत परवानगी दिल्यानंतर आणि उच्च आणि तांत्रिक शिक्षण विभागाच्या सीईटी सेलनं परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. या तारखा पुढीलं प्रमाणं…

१) पीसीबी ग्रुप – १, २, ४, ५, ६, ७, ८, ९ ऑक्टोबर २०२०
२) पीसीएम ग्रुप – १२, १३, १४, १५, १६, १९, २० ऑक्टोबर २०२०

त्याचबरोबर परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक हे सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असून प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना या वेबसाईटवरुन डाऊनलोड करता येणार आहे. उमेदवारांनी परीक्षेसंदर्भातील ताज्या अपडेट आणि सूचना जाणून घेण्यासाठी www.mahacet.org या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन सेलकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या MHT-CET अर्थात अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर MHT-CET परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयानं त्यावरून याचिकाकर्त्यांना फटकारत मागणी फेटाळून लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 6:53 pm

Web Title: revised dates for mht cet 2020 exams announced aau 85
Next Stories
1 …तर पुढचं अधिवेशन मातोश्रीच्या गच्चीवर घ्या; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
2 राज्य सरकार पुरग्रस्‍तांवर उपकार करत आहे, अशा थाटात पंचनामे केले जात आहेत – सुधीर मुनगंटीवार
3 या सरकारला आरक्षण कायम राखता आले असते, पण…; फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका
Just Now!
X