शेतातील पाण्यामुळे भातकापणीसाठी मजुरीचा खर्च तिप्पट

लोकसत्ता वार्ताहर

panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
More than 20 thousand farmers objected to MMRDA notification
‘एमएमआरडीए’च्या अधिसूचनेला २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या हरकती
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

वाडा :  गेल्या आठवडय़ात झालेल्या परतीच्या वादळी पावसाने पालघर जिल्ह्यतील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या भातपिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. सध्या पाऊस निघून गेला असला तरी, शेतामध्ये भरलेले पाणी अजूनही कमी झालेले नसल्याने शेतामध्ये पिकून आलेल्या भाताची कडपे शेताबाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना तिप्पट मजुरी खर्च करावा लागत आहे. या वाढीव खर्चाने शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत.

वादळवाऱ्यासह झालेल्या परतीच्या पावसाने पालघर जिल्ह्यतील विशेषत: वाडा तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या भातपिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापणी केलेले भातपीक काही शेतकऱ्यांचे वाहून गेलेले आहे. काहींचे संपूर्ण भातपीक शेतातच कुजून गेले आहे. तर काही भातपिकांच्या दाण्यांना शेतातच कोंब फुटले आहेत.

बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात परतीच्या पडलेल्या पावसाचे पाणी अजूनही सुकून गेलेले नाही. परतीच्या पावसामुळे कापणी करता न आल्याने ही पिके शेतातच गळून चालली आहेत. शेतात अजूनही पाणी असल्याने कापणी करून भाताची कडपे कशी सुकावायची या चिंतेने येथील शेतकरी ग्रासलेले आहेत. नाइलाजाने अधिक मजूर कामाला बोलावून शेतातील पाण्यातून आजूबाजूच्या मोकळ्या जागेत ही कडपे सुकविली जात आहेत. यासाठी शेतकऱ्यांना तीन पटीने अधिक मजुरीसाठी खर्च करावा लागत आहे.

कनसरी आमुची धनसरी

शेतात साचलेल्या पाण्यात भातपीक कुजून गेलेले असतानाही या कुजलेल्या भाताच्या कडपांना शेतकरी पाण्याबाहेर काढून मोकळ्या जागेत सुकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण नष्ट झालेल्या या पिकापासून काहीही हाती येणार नाही, हे माहिती असतानाही शेतकरी असे का करतोय, असे मौजे पीक येथील दमयंती दामोदर पाटील या शेतकरी महिलेला विचारले असता, कनसरी आमुची धनसरी आहे, निसर्गाच्या कोपात तिची अशी झालेली अवस्था आमच्या डोळ्यासमोर पाहावत नाही, म्हणूनच पाण्याबाहेर काढून कनसरी सुकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.