जगभरात आज Valentine Day साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. पण, व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देताना त्यांनी एक हटके ट्वीट केलं असून त्याद्वारे केंद्र सरकारला टोला लगावला आहे.
दोन दिवसांपूर्वीच महानगरांमध्ये विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या नव्या किमती लागू झाल्या आहेत. त्यानुसार मुंबईत गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल १४५ रुपयांनी वाढ झालीये. यावरुनच रोहित पवार यांनी, “हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे! हा दिवस स्वच्छ व खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे. आज तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या… गॅसचा दर ९१० रुपये प्रती सिलिंडर झालाय”, असं ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधलाय.
हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे!
हा दिवस स्वच्छ व खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे. आज तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या… गॅसचा दर ९१० रुपये प्रती सिलिंडर झालाय.This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 14, 2020
दरम्यान, विना अनुदानित १४ किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत १४४.५० रुपयांपासून १४९ रुपयांपर्यंत वाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत.