News Flash

आशिष शेलार गप्प का?; कंगनाच्या विधानावरून काँग्रेसचा सवाल

"ती शिवसेनेला मतदान केले असे खोटे सांगते"

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलिसांपाठोपाठ अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याविषयी असभ्य भाषेत टीका केली होती. या टीकेनंतर कंगनावर बॉलिवूडमधून टीकेची झोड उठली. महाराष्ट्रातूनही अनेकांनी संताप व्यक्त केला होता. याच मुद्यावरून काँग्रेसनं भाजपावर निशाणा साधला असून, भाजपाचे नेते आशिष शेलार यांना त्यांच्या मौनावरून सवाल केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून अभिनेत्री कंगना रणौत तिच्या विधानांमुळे चर्चेत आहे. सुरूवातीला बॉलिवूडमधील कलाकारांवर टीका करणाऱ्या कंगनानं मुंबई पोलीस व मुंबईविषयी वादग्रस्त विधानं केली. त्यानंतर कंगनावर टीकेची झोड उठली होती. या वादावर उर्मिला मातोंडकर यांनी भूमिका मांडली. त्यावरून संतापलेल्या कंगनानं त्यांचा उल्लेख ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ असा केला. कंगनाच्या या विधानावर भाजपाकडून कोणताही निषेध न करण्यात आल्यानं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून सवाल उपस्थित केला आहे.

आणखी वाचा- फॅसिझम थांबवा, आम्हाला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हवीये; कंगनाचं ट्विट

“महाराष्ट्राची कन्या उर्मिला मातोंडकर यांच्याबद्दल भाजपासंचालित कंगना रणौत हिने अत्यंत हीन शब्द काढूनही महाराष्ट्र भाजपानं साधा निषेधाचा शब्दही काढला नाही. मतदारयादीत तिचे नाव वांद्रे पश्चिम मतदारसंघात असतानाही ती शिवसेनेला मतदान केले असे खोटे सांगते. आशिष शेलार गप्प का?,” असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला आहे.

आणखी वाचा- छत्रपती शिवरायांचा फोटो पोस्ट करत उर्मिला मातोंडकर यांचं कंगनाला उत्तर

काय म्हणाली होती कंगना?

“उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. त्या अभिनयासाठी तर नक्कीच ओळखल्या जात नाहीत”, अशा शब्दांत अभिनेत्री कंगना रणौतने उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका केली. ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली होती, “मी उर्मिला मातोंडकर यांनी दिलेली एक मुलाखत पाहिली. संपूर्ण मुलाखतीत त्या मला चिडवत होत्या. माझ्या संघर्षाची खिल्ली त्यांनी उडवली. भाजपाकडून तिकिट मिळावं यासाठी मी हे सर्व बोलत असल्याचं त्यांनी म्हटलं. पण मला तिकिट मिळवणं काही इतकं अवघड नाही, हे एखाद्या हुशार व्यक्तीला सहज समजेल. त्यासाठी मी माझ्या आयुष्याशी खेळणार नाही आणि माझ्या संपत्तीचीही वाट लावून घेणार नाही. उर्मिला मातोंडकर या सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत. त्या त्यांच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखल्या जात नाहीत. कशामुळे ओळखल्या जातात मग? सॉफ्ट पॉर्नसाठीच ना? जर त्यांना तिकिट मिळू शकतं, तर मला का नाही मिळणार? कोणालाही तिकिट मिळू शकतं,” अशी कंगनानं केली होती. ज्यावरून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिला सुनावलंही होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 11:44 am

Web Title: sachin sawant congress ashish shelar bjp urmila matondkar kangana ranaut bmh 90
Next Stories
1 “उद्धव ठाकरेंनी योगी आदित्यनाथांचं अभिनंदनही केलं नाही,” आशिष शेलारांनी व्यक्त केली खंत
2 एनडीए आणि भाजपात फार जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले नाहीत, संजय राऊत यांचा दावा
3 ब्राह्मण असल्याने टार्गेट केल्याच्या फडणवीसांच्या आरोपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले….
Just Now!
X