News Flash

नंदा खरे यांच्या ‘उद्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

साहित्य अकादमी पुरस्कार - २०२० ची घोषणा

संग्रहीत

साहित्य अकादमी पुरस्कार – २०२० आज (शुक्रवार) जाहीर झाले असून नागपूरचे नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला मराठीसाठी सन २०२०चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

तसेच, ‘आबाची गोष्ट’ या आबा गोविंदा महाजन यांच्या लघुकथासंग्रहास बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, मराठीसाठी सतीश काळसेकर, वसंत आबाजी डहाके आणि डॉ.निशिकांत मिरजकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

साहित्य अकादमीने आज (शुक्रवार) २० भाषांसाठी वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये सात कविता संग्रह, चार उपन्यास, पाच कथा संग्रह, दोन नाटकं, एक-एक संस्मरण आणि महाकाव्यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 5:52 pm

Web Title: sahitya akademi award 2020 announced msr 87
Next Stories
1 ‘लोकबिरादरी’तून भावी डॉक्टर घडणार; डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना देणार मोफत मार्गदर्शन
2 वसईमध्ये लसीकरण केंद्रात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; आरोग्य सुविधा नसल्याने संताप
3 सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा – संभाजीराजे
Just Now!
X