सांगली महापौर निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपाला मोठा धक्का बसला आहे. बहुमत असलेल्या महापालिकेत महापौर निवडीवेळी पक्ष शाबूत ठेवण्याबरोबरच बंडखोरी टाळण्याचं आव्हान पेलण्यात भाजपाला अपयश आलं आहे. सांगली पालिकेत महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या उमेदवाराची निवड झाली आहे. सत्ताधारी भाजपाला पालिकेत बंडखोरीचा मोठा फटका बसला असून हातातील सत्ता गमावली आहे.

सत्ताधारी भाजपची पाच मतं फुटली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी यांची महापौरपदी निवड झाली आहे. महापौर निवडीवेळी भाजपाचे दोन सदस्य गैरहजर होते. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेश पाटील विजयी झाले आहेत.

Vanchit Bahujan Aghadi, Yavatmal,
यवतमाळमध्ये ‘वंचित’चे बळ नवख्या पक्षाच्या उमेदवारास
lok sabha election 2024, nagpur, ramtek, chandrapur, gadchirlo, bhadara, gondia, voting, first pahse
पूर्व विदर्भात पाचही मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती
Arunachal Pradesh Assembly
निवडणुकीच्या रणसंग्रामाशिवाय आमदार अन् खासदार होणाऱ्यांची गोष्ट
ips officer abdur rahman marathi news, ips officer abdur rahman dhule lok sabha marathi news
धुळे मतदारसंघात ‘हे’ माजी पोलीस महानिरीक्षक वंचितचे उमेदवार

महापालिकेत भाजपाचे संख्याबळ पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले ४१ आणि समर्थन दिलेले दोन अपक्ष असं एकूण ४३ आहे. माजी महापौर हारूण शिकलगार यांचे अकाली निधन झाल्याने काँग्रेसचे १९, तर राष्ट्रवादीचे १५ सदस्य आहेत. बहुमतासाठी ३९ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक होता.

तटस्थ -२
दिग्विजय सूर्यवंशी – ३९
धीरज सूर्यवंशी – ३६
(१ सदस्य निधन)
एकूण संख्याबळ –
७८