News Flash

दुःखद! भारत-चीन सीमेवर कर्तव्यावर असताना सांगोल्यातील जवानाचा करोनाने मृत्यू

देशात करोनाबळींची संख्या दिवसागणिक वाढतच आहे

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कमलापूर येथील मूळ राहणारे भारतीय जवान अमोल किरण आदलिंगे (वय ३०) यांचा भारत-चीन सीमेवर सिक्कीममध्ये करोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला. काल बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचं निधन झालं.

अमोल आदलिंगे हे २०१२ साली हैदराबाद येथून भारत-तिबेट सीमा पोलीस दलात भरती झाले होते. सिक्कीममध्ये नेहमीप्रमाणे कर्तव्यावर असताना त्यांना करोना विषाणूचा संसर्ग झाला. त्यांच्यावर उपचार सुरू असताना अखेर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वृध्द आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे.

मृत आदलिंगे यांच्या पार्थिवावर सिक्कीम येथेच भारत-तिबेट सीमा पोलीस दलाकडून अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे आदलिंगे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 3:22 pm

Web Title: sangola soldier dies due to corona virus in sikkim while on duty indo china border nck 90
Next Stories
1 राज ठाकरे यांचा उदय सामंत यांना फोन; दोन दिवसांत निर्णय घेण्याचं दिलं आश्वासन
2 राज्य शिखर बँक घोटाळा; अजित पवारांसह ६९ जणांना ‘क्लीन चीट’
3 तारे तारकांकडे सापडलेल्या १/२ ग्रॅम ड्रग्सची चौकशी झाली असेल, तर एनसीबीनं…- शिवसेना
Just Now!
X