News Flash

अ‍ॅड. विलास पाटणे यांच्या ‘सापडलेलं आकाश’ पुस्तकाचे प्रकाशन

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे यांनी लिहिलेल्या ‘सापडलेलं आकाश’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले. या

| April 18, 2013 04:45 am

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे यांनी लिहिलेल्या ‘सापडलेलं आकाश’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले.  या पुस्तकामध्ये प्रतिभासंपन्न व्यक्तींची शब्दचित्रे पाटणे यांनी रेखाटली आहेत. त्यांची श्रद्धापूर्वक आणि मूल्यसंस्कारित जीवन जगण्याची भूमिका या शब्दचित्रातून दिसून येते, असे गौरवोद्गार काढून कर्णिक म्हणाले की, अन्य कोणत्याही साहित्य प्रकारापेक्षा हाडामांसाची माणसे रेखाटणे जास्त कठीण असते. ते काम या पुस्तकात यशस्वीपणे झाले आहे. पुस्तकात रेखाटलेल्या व्यक्तींची समाजाशी असलेली नाळ पाटणे यांनी आपल्या मनोगतात कथन केली. ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर व विजय कुवळेकर यांचीही या प्रसंगी भाषणे झाली. मत्र प्रकाशन संस्थेचे अनिल दांडेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा.वालावलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2013 4:45 am

Web Title: sapadlele aakash book published
टॅग : Publish
Next Stories
1 नाशिकमध्ये अण्णाभाऊ साठे व्याख्यानमाला
2 वनवासींच्या घरात आता गॅस, बायोगॅस!
3 प्रत्येक टँकरमागे किमान ५० लिटर इंधनाची ‘चोरी’!
Just Now!
X