News Flash

सातारामधील मेणवलीमध्ये नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

तीन पैकी दोघांना वाचवण्यात यश, एकाचा बुडून मृत्यू

menawali ghat, satara
मेणवली घाट (संग्रहित छायाचित्र)

सातारा जिल्ह्यातील मेणवलीमध्ये कृष्णा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. रोहन मोरे असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेत आणखी दोन तरुण नदीत बुडाले होते. मात्र स्थानिकांच्या सतर्कतेमुळे या दोन तरुणांना वाचवण्यात यश आले असून दोन्ही तरुणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मेणवलीमध्ये कृष्णा नदी किनारी घाट बांधण्यात आला असून हा ऐतिहासिक घाट पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. मुंबईतील मोरे कुटुंबीय वाईतील बोडवलीमध्ये यात्रेसाठी आले होते. यात्रेवरुन परतत असताना मोरे कुटुंबीयांनी मेणवलीमधील घाटावर जाण्याचा निर्णय घेतले. कुटुंबातील सर्वजण पोहण्यासाठी नदीत उतरले. यादरम्यान रोहित मोरे (वय २३) हा तरुण पाण्यात बुडताना दिसला. त्याला वाचवण्यासाठी स्नेहदीप वाघमारे (वय २६) आणि रोहन मोरे हे दोघेही नदीत उतरले. मात्र खोलीचा अंदाज न आल्याने हे तिघे बुडू लागले. शेवटी स्थानिकांच्या मदतीने या तिघांना बाहेर काढण्यात आले. यातील रोहन मोरे याचा मृत्यू झाला. तर उर्वरित दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

वाईच्या पश्चिमेला सुमारे तीन कि.मी. वर कृष्णेच्या डाव्या काठावर मेणवली हे एक टुमदार गाव आहे. गावात नाना फडणीसांचा वाडा, मेणवलेश्वर व विष्णू अशी दोन देवळे आहेत. या भागात अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांचे चित्रिकरणही झाल्याने मेणवली घाटावर येणा-या पर्यटकांची संख्या दिवसेगणिक वाढत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2017 7:55 pm

Web Title: satara youth drowns in river trying to save others in krishna river menawali
Next Stories
1 आमदार परिचारकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, संतप्त माजी सैनिकांची मागणी
2 भोसरीतील जमीन व्यवहारांची माहिती नाही, झोटिंग समितीसमोर खडसेंचे घुमजाव ?
3 मी बांगड्या भरलेल्या नाहीत; गाड्यांवरील दगडफेकीनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया
Just Now!
X