News Flash

‘सीरम’ने काहीही करून महाराष्ट्राला लस देताना झुकतं माप द्याव – आरोग्यमंत्री टोपे

यासाठी लागणारी किंमत राज्य सरकार लगेच द्यायला तयार आहे, असं देखील म्हणाले आहेत.

सीरम इन्स्टिट्यूट ही महराष्ट्रात पुण्यात आहे त्यामुळे अदर पूनावाला यांनी लस देण्याच्याबाबतीत महाराष्ट्राला काहीसं झुकतं माप द्यावं, अशी विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राज्यात सध्या करोना संसर्ग वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने कोरनाबाधित आढळून येत आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यालाही सुरूवात झाली आहे. मात्र, लस तुटवड्यामुळे राज्य सरकारकडून हा लसीकरणाचा टप्पा राबवताना अडथळे येत असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आज आरोग्यमंत्री टोपेंनी सीरमचे पूनावाला यांना ही विनंती केल्याचे दिसत आहे.

”अदर पूनावाला यांना आमची विनंती आहे की, ते पुण्यातील असल्याने व महाराष्ट्रातच सीरम इन्स्टिट्यूट असल्याने, काहीही करून सीरम इन्स्टिट्यूटने झुकतं माप हे महाराष्ट्राला दिलं पाहिजे.” असं राजेश टोपे एबीपी माझाशी बोलाताना म्हणाले आहेत.

तसेच, ”कुठल्याही पद्धतीने आम्हाला लसीकरण १८ ते ४४ असेल, यासाठी लागणारी किंमत ही राज्य सरकार लगेच द्यायला तयार आहे. परंतु आपल्याला अधिक जास्त झुकतं माप मे व जून महिन्यात असलायला हवं. जेणेकरून आपल्याला अधिक गतीनं लसीकरण करता येईल. आज लस उपलब्ध नसल्याने, आपल्या जवळ निधी आहे आपण खर्च करायला तयार आहोत, विकत घ्यायला तयार आहोत पण उपलब्ध नसल्याने आज आपल्याला १८ ते ४४ वयोगाटातील लसीकरण ते कमी गतीनं करावं लागत आहे.” असंही यावेळी राजेश टोपेंनी सांगितलं.

“जुलैपर्यंत लसींचा तुटवडा भासू शकतो”- अदर पुनावालांचं मत

देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशातच देशभरात अनेक ठिकाणी करोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा भासू लागला आहे. जुलै महिन्यापर्यंत लसींची कमतरता भासू शकते असं सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी स्पष्ट केलं आहे.

Corona Vaccine: सत्य तर जाणून घ्या, पुनावालांचं आवाहन

दरम्यान, सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावला यांनी पत्रक काढून आपली बाजू मांडली आहे. सरकारने ऑर्डर दिली नसल्याने निर्मिती मंदावल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसात येत होत्या. मात्र या बातम्याचं खंडन करत त्यांनी आपली बाजू पत्रकाद्वारे मांडली आहे. आम्हाला सरकारकडून सर्वोतोपरी मदत मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 8:35 pm

Web Title: serum should supply more vaccine to maharashtra health minister tope msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 उद्यापासून साताऱ्यात संपूर्ण लॉकडाउन; किराणा, भाजीपाल्यासह सर्वकाही बंद
2 “भाजपाचे राज्य म्हणजे गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ”
3 “पंढरपूरमधील पराभवानंतर अजित पवार राजीनामा देणार का?”
Just Now!
X