News Flash

शरद पवार यांना आता घरपोच ‘डी.लिट.’

अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त पवार यांना विद्यापीठाने मानद पदवी देण्याचा निर्णय घेतला.

Nagar Palika & Parishad Election Result LIVE: पहिल्या टप्प्यात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले होते. तब्बल ३१ नगरपालिका जिंकून भाजपने आघाडी घेतली आहे. तर ५२ ठिकाणी भाजपचे थेट नगराध्यक्षही निवडून आले आहेत.

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना डी.लिट. ही मानद पदवी बहाल करण्याचा निर्णय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने मागेच जाहीर केला, पण हा मान स्वीकारण्यासाठी पवारांना वेळ नसल्याने त्यांना प्रस्तावित मानद पदवी घरपोच देण्याचा विचार विद्यापीठात सुरू आहे.

अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त पवार यांना विद्यापीठाने मानद पदवी देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी कुलपतींची मान्यता घेण्यात आली. स्वत: पवार यांनीही विद्यापीठाच्या प्रस्तावास संमती दिल्यानंतर त्यांनीच दिलेल्या वेळेनुसार गेल्या ऑगस्ट महिन्यात १७ तारखेला विशेष पदवीदान समारंभ निश्चित झाला होत.

पण नियोजित कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी पवारांच्या कार्यालयाने विद्यापीठाकडे ‘ई-मेल’ पाठवून कार्यक्रम रद्द करण्याची सूचना दिल्याने विद्यापीठ प्रशासनाची पंचाईत झाली.

नंतर वैद्यकीय कारणांमुळे पवारांचा दौरा रद्द झाल्याचे समोर आले. पुढच्या दोन महिन्यांत पवार मरठवाडय़ात दोन वेळा आले, तसेच आता २७ ऑक्टोबर रोजी ते उस्मानाबादेत येत असले तरी नांदेडच्या नियोजित कार्यक्रमासाठी त्यांनी वा त्यांच्या कार्यालयाने तारीख व वेळ दिलेली नाही, ही बाब संबंधितांना चमत्कारिक वाटत असून आता भव्य कार्यक्रमाचा घाट घालण्याऐवजी, पवारांना ते सांगतील तेथे मानद पदवी बहाल करावी, असा विचार विद्यापीठ प्रशासन करत आहे. या माहितीला कुलगुरूंनीही दुजोरा दिला.

स्वाराती मराठवाडा विद्यापीठाने मागील काळात प्रा. एन. डी. पाटील, शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर, मॉण्टेकसिंग अहलुवालिया, गो. रा. म्हैसेकर आदी दिग्गजांना मानद पदवी जाहीर केली. या सर्वानी विद्यापीठातील दीक्षान्त मंचावर येऊन सन्मान स्वीकारला होता. पवार यांनी पुन्हा तारीख व वेळ का दिली नाही, याबद्दल नेमकी माहिती मिळू शकली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 1:53 am

Web Title: sharad pawar get d litt honorary degree
Next Stories
1 पत्नीसह दोन चिमुकल्यांचा खून
2 चंद्रपूर येथे महाविद्यालयीन तरूणीवर बलात्कार करून खून
3 अमरावतीच्या ‘टेक्स्टाइल पार्क’समोर अनेक अडचणी
Just Now!
X