News Flash

Video : येथे पाहा शरद पवार यांची मुलाखत

एक शरद, सगळे गारद…!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच एक विशेष मुलाखत दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’चे कार्यकारी संपादक म्हणून  ही मुलाखत घेतली आहे. मागील अनेक दिवसांपासून राऊत यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन या मुलाखतीचे प्रोमो पोस्ट करण्यात येत होते. आज सकाळी नऊ वाजता ही मुलाखत प्रदर्शित झाली. एकूण तीन भागांमध्ये ही मुलाखत असून एक शरद, सगळे गारद…! अशा मथळ्याखाली ती प्रदर्शित करण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगळता पहिल्यांदाच राऊत यांनी संपादक म्हणून ठाकरे कुटुंबाबाहेरील एखाद्या व्यक्तीची अशी प्रकट मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीमधून सध्याच्या करोनासंकटापासून ते राज्यातील राजकारण, महाविकास आघाडीसंदर्भातील आपले मत शरद पवार रोखठोकपणे मांडणार असल्याची झलक मुलाखतीच्या प्रोमोमधून पहायला मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 8:31 am

Web Title: sharad pawar interview by sanjay raut part one scsg 91
Next Stories
1 नांदेडमध्ये उद्यापासून टाळेबंदी
2 वणी येथे पुरात वाहून गेलेल्या तिघांचा मृत्यू
3 अकोल्यात ६९ कैद्यांसह ८१ जण करोनामुक्त
Just Now!
X