शासनाच्या वतीने प्रतापगडावर आज, शुक्रवारी शिवप्रतापदिन सोहळा होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी नितीन पाटील,पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्रांताधिकारी अस्मिता मोरे,महाबळेश्वरचे तहसीलदार अतुल म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिवप्रतापदिनानिमित्त शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता आरती होईल. सकाळी सव्वानऊ वाजता श्री भवानी माता मंदिरासमोर ध्वजवंदनाचा कार्यक्रम होईल, साडेनऊ वाजता शिवप्रतिमेचे पूजन , पालखी पूजन व मिरवणूक होईल. सकाळी सव्वादहा वाजता शिवपुतळयास जलाभिषेक आणि शिवाजी महाराजांच्या पुतळयावर पुष्पवृष्टी होईल. या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख यांनी केले आहे.
प्रतापगड आणि वाई येथे होणाऱ्या शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमासाठी मोठा पोलीस बंदोबस्त वाई, महाबळेश्वर आणि प्रतापगडावर ठेवण्यात आला असून अनेकांना महाबळेश्वर तालुका बंदीच्या नोटीसा सातारा पोलीसांकडून बजावण्यात आल्या आहेत.