चिरंजीवाच्या उमेदवारीवरून पक्षाविरोधात बंडाचे शस्त्र उगारणारे शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून एकाएकी शांत झाले. कालच्या घटनेवरून पक्ष प्रमुखांनी त्यांना डोस पाजल्यानंतर ते आज चांगलेच नरमले. मी व माझे कुटुंबीय आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. नाशिकमध्ये शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी प्रतिक्रियाही त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना दिली. पांडे यांचा मुलगा ऋतुराज यास शिवसेनेने उमेदवारी दिली नाही म्हणून काल शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना पांडेंच्या समर्थकांनी प्रचंड मारहाण केली. ही घटना घडल्यानंतर दिवसभर हे प्रकरण चर्चिले गेले. यानंतर पक्षाविरोधात पांडेंनी बंडाचे हत्यार उपसले.

भारतीय जनता पार्टीच्या यादीत ऐनवेळी पांडे यांचे पुत्र ऋतुराज पांडे व भावजई कविता पांडे यांचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून प्रसिद्ध झाले. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी पांडे यांना मातोश्रीवर पाचारण करण्यात आले. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाशी चर्चा झाल्यानंतर पांडे हे शांत झाले. बंडखोरीचा इशाराही त्यांनी मागे घेतला. उलट कट्टर शिवसैनिक म्हणून आपण यापुढे काम करू असे म्हणत त्यांनी हा वाद शमवण्याचा प्रयत्न केला. काल जे काही घडले ते गैरसमजातून झाले. शिवसैनिकांवर गुन्हे जरी दाखल असले तरी आम्ही हे प्रकरण पक्षांतर्गत मिटवून घेऊ असेही ते म्हणाले. शिवसेनेतर्फे मी किंवा माझा मुलगा ही निवडणूक लढणार नसून केवळ माझ्या भावजई कविता पांडे या ही शिवसेनेतर्फे लढणार आहेत. भाजपाकडून मुलाला तिकीट मिळाल्याची ही केवळ अफवा असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
What Ram Satpute Said?
“सुशीलकुमार शिंदेंनी मुख्यमंत्री असताना १२ अतिरेक्यांना वाचवलं”, राम सातपुतेंचा गंभीर आरोप