News Flash

“करोनाचे विषाणू काय आपल्या पक्षाचे….,” मास्क न घालणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांचा टोला

"सामाजिक जीवनात असताना भान बाळगलं पाहिजे"

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना यांना टोला लगावला असून करोनाचे विषाणू काय आपल्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत असं म्हटलं आहे. राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असून यावेळीही त्यांनी मास्क घातलेला नव्हता. विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या स्वागतासाठी माजी महापौर अशोक मुर्तडक पोहोचले होते, यावेळी राज ठाकरे यांनी त्यांना मास्क काढा अशा सूचना केल्या. राज ठाकरे यांच्यासोबत उपस्थित अनेक कार्यकर्ते मास्कविनाच उपस्थित होते.

‘तुम्ही मास्क घातलं नाही’, असं पत्रकाराने राज ठाकरेंना म्हणताच…

संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना राज ठाकरेंना टोला लगावला आहे. “करोनाचे विषाणू काय आपल्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. ते कोणालाही सोडत नाहीत. याच्यापासून तुम्हाला त्रास आहे आणि तुमच्यामुळे इतरांनाही त्रास आहे. अजित पवारांनी त्यांच्या भाषेत सांगितलं आहे. आपण सामाजिक जीवनात असताना भान बाळगलं पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

मी मास्क घालत नाही – राज ठाकरे
२७ फेब्रुवारीला दादरमध्ये मनसेने आयोजित केलेल्या मराठी स्वाक्षरी मोहिमेसाठी अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वाक्षरी मोहिमेच्या फलकावर राज यांनी स्वाक्षरी केल्यानंतर पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना राज ठाकरे यांनी उत्तरं दिली. यावेळी एका पत्रकाराने राज यांना तुम्ही मास्क घातलं नाही असं प्रश्न विचारला. यावर राज यांनी खोचक टकाक्ष टाकत, “मी घालत पण नाही,” असं उत्तर दिलं. तसेच पुढे त्यांनी, “मी तुम्हालाही सांगतो,” असं म्हणत तिथून निघून गेले.

यापूर्वीही राज यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०२० साली मे महिन्यामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती तिथेही मास्क न घालताच हजेरी लावली होती. राज यांच्या पाठोपाठ लगेचच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीसही मंत्रालयामध्ये दाखल झाले. फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर होते. या दोघांनाही नियमांचे पालन करत मास्क घातल्याचे चित्र दिसले. मात्र राज यांनी मास्क बंधनकारक असतानाही घातलं नव्हतं. याचसंदर्भात पत्रकारांनी नंतर प्रश्न विचारला असता राज यांनी, “सगळ्यांनी मास्क लावला आहे, म्हणून मी लावला नाही”, असं उत्तर दिलं होतं.

संजय राऊतांनी भरला दंड –
संजय राऊत यांनी यावेळी आपण मास्क न घातल्याने दं भरला असल्याची माहिती दिली. “मी स्वत दंड भरला आहे. दिल्लीत असताना गाडीत बसलो होतो तेव्हा माझा मास्क खाली आला होता. विमानतळासमोर माझी गाडी दोन पोलीस कर्मचाऱ्यांकडून अडवण्यात आली. माझे पीए सोमनाथ समोर बसले होते. त्यांनी काय झालं विचारलं असता तुमच्या साहेबांनी मास्क घातला नसल्याचं सांगितलं. सोमनाथ यांनी खासदारसाहेब असल्याचं सांगितल्यानंतर पोलिसानेही खासदारांनीच कायदा तयार केलं असल्याची सांगितलं. मी ताबडतबोत सोमनाथ यांना आपली चूक आहे, वाद घालायचा नाही. नियम आहे त्याप्रमाणे दंड भरायचा सांगितलं,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 4:36 pm

Web Title: shivsena sanjay raut mns raj thackeray mask sgy 87
Next Stories
1 करोना काळातही कृषी क्षेत्रात ११.७ टक्के वाढ अपेक्षित! राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर
2 शिवसेनेचे मत म्हणजे आमचे मत नव्हे, नाना पटोले यांचं वक्तव्य
3 “फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच १ एप्रिलपासून मिळणार स्वस्त वीज”
Just Now!
X