शिवसेना हिंदुत्वापासून दूर जात असल्याची टीका काही मतलबी लोकांनी सुरू केली आहे. मात्र शिवसेना कधीही हिंदुत्वापासून दूर जाणार नाही असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीतही हेच सांगितलं आहे याचीही आठवण देसाई यांनी करुन दिली आहे.

या मुद्द्यावर ते पुढे म्हणाले “शिवसेनेने हिंदुत्वाची बांधिलकी कायम ठेवली आहे. जेव्हा हिंदुत्वावर आघात होण्यासारखा प्रकार घडतो तेव्हा शिवसेनाच धाडसाने पुढे येते हे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे याविषयी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही. शिवसेना हिंदुत्वाशी नेहमीच कटिबद्ध आहे. काही बेगडी हिंदुत्ववादी शिवसेना हिंदुत्वापासून दूर जात असल्याची टीका करीत आहे. शिवसेनेचे हिंदुत्वावादी आपल्या पाठीशी यावेत असा त्यामागे डाव आहे. त्यामुळे अशा टीकांना काहीही अर्थ नाही, असेही ते म्हणाले.

शेजारी राज्याप्रमाणे विजेचे दर

कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक प्रश्न महत्त्वाच्या आहेत त्याकडे लक्ष द्यावे लागेल. असा उल्लेख करत उद्योग मंत्री देसाई यांनी राज्यातील उद्योगांना स्पर्धेत टिकण्यासाठी शेजारी राज्याच्या तुलनेत समान देण्यासाठी आपण आग्रही असल्याचे सांगितले. ते म्हणाले, उद्योगांना स्पर्धा करावी लागते. त्यातून स्पर्धेत टिकण्यासाठी विजेचे दर इतर राज्यांच्या बरोबरीने असावेत अशी त्यांची मागणी आहे. याबाबत मंत्रिमंडळात विषय चर्चेला आला आहे. उद्योग खात्यातही यावर चर्चा सुरू आहे. इतर राज्यांप्रमाणे राज्यातील विजेचे उद्योगाचे दर असावेत यासाठी आपण आग्रही आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी केले.