करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या ऑनलाइन शिकवणी वर्ग सुरु झाले आहेत. पण कोल्हापूरातील एका २० वर्षीय तरुणीने ऑनलाइन शिकवणी वर्गात काही समजत नसल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐश्वर्या पाटील असे विद्यार्थीनीचे नाव आहे. या घटनेची करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या बाबासो. पाटील (वय २० वर्ष) ही एका फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. सध्या करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शिकवण्याचे वर्ग ऑनलाइन सुरू होते. पण ऑनलाइन शिक्षण ऐश्वर्याला जमत नव्हते. त्यामुळे आठवडाभरापासून ऐश्वर्या अस्वस्थ व निराश होती. याच नैराश्यातून तिने राहत्या घरातील पंख्याला साडीने गळफास घेतला.
हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. नातेवाईकांनी उपचारासाठी ऐश्वर्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 17, 2020 9:26 am