सोळा वष्रे वयाच्या मुलीला तिचे कामही न पाहता नोबेल पुरस्कार दिला जात असेल तर अशा पुरस्कारांचे महत्त्व ते काय, असा सवाल ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रमुख श्री श्री रविशंकर यांनी येथे उपस्थित केला. ते लातूर येथील बंधाऱ्याच्या रुंदीकरणाच्या पाहणी करण्यासाठी आले होते.
आंतरराष्ट्रीयस्तरावर तुम्ही चांगले काम करत आहात. मात्र, तुमची धडपड नोबेल पारितोषिक मिळवण्यासाठी सुरू आहे असे विचारले असता रविशंकर म्हणाले,‘‘लोक काहीही चर्चा करतात. माझ्याकडेही पूर्वीच पुरस्कारासाठी काही जण येऊन गेले, तेव्हा अशा पुरस्कारात रस नसल्याचे मी त्यांना सांगितले होते. १६ वर्षांच्या मुलीला जर पुरस्कार दिला जात असेल तर अशा पुरस्काराचे महत्त्व काय,’’ असा प्रश्न त्यांनी केला. मलाला हिला दिलेला पुरस्कार चुकीचा आहे काय, या उपप्रश्नाला उत्तर देताना,‘ नाही तर काय असे म्हणत मलाला यांना देण्यात आलेला पुरस्कार चुकीचा असल्याचे सांगितले.