News Flash

रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार; वकिलांची माहिती

रिया निरपराध असल्याचा वकिलांनी केला पुनरुच्चार

रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार; वकिलांची माहिती

रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार असल्याचे रियाचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी म्हटलं आहे. आज (रविवारी) सकाळी रियाच्या घरी नोर्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई पोलिसांसह दाखल झाली होती. यावेळी एनसीबीनं तिला समन्स बजावलं आणि स्वतःहून चौकशीसाठी येण्याचा किंवा आत्ता पोलिसांसोबत येण्याचा पर्याय तिच्यासमोर ठेवला. त्यानंतर रियाने स्वतःहून चौकशीसाठी हजर राहण्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. या पार्श्वभूमीवर रियाच्या वकिलांनी ही माहिती दिली. दरम्यान, रिया एनसीबीच्या कार्यालयात हजर झाली आहे.

रियाचे वकिल अॅड. मानेशिंदे म्हणाले,”जर हे प्रकरण जादूटोण्याचं असेल तर रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार आहे. प्रेम करणं हा गुन्हा असेल तर ती याचे सर्व परिणाम भोगायला तयार आहे. बिहार पोलिसांनी सीबीआय, ईडी आणि एनसीबीच्या मदतीने दाखल केलेल्या खोट्या केसेसविरोधात  निरपराध असल्यानेच रियाने कुठल्याही कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केलेला नाही.”

एनसीबीने रियाला सकाळी घरी जाऊन समन्स बजावल्यानंतर रिया एनसीबी समोर चौकशीसाठी हजर होण्याकरिता घरातून आपल्या कारने बाहेर पडली. त्यानंतर अॅड. मानेशिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मानेशिंदे यांच्या विधानावरुन रियाला चौकशीदरम्यान अटक होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

दरम्यान, एनसीबीचे उपसंचालक अमित घावटे म्हणाले होते की, “रिया इथे चौकशीसाठी येणार आहे. या ठिकाणी तिच्याकडे केवळ चौकशी केली जाणार आहे. यानंतर जे काही समोर येईल त्याची माहिती माध्यमांना दिली जाईल.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2020 12:03 pm

Web Title: so riya chakraborty ready for arrest information of lawyers aau 85
Next Stories
1 कई तूफानों का रुख मोड चुका हूँ ! सूचक ट्विटच्या माध्यमातून संजय राऊतांचा विरोधकांना इशारा
2 तीन चार दिवस संसार केल्यावर अजित पवारांवर कशी टीका करतील, खडसेंचा फडणवीसांवर निशाणा
3 रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारत करोनाबाधित रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक
Just Now!
X