News Flash

सोलापूरच्या शिक्षकाचा जगात डंका, तुकाराम मुंढेंनी ठोकला ‘सलाम’ ; म्हणाले…

सात कोटी रुपयांचा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले पहिले भारतीय शिक्षक...

सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी भारताचा झेंडा जगात फडकावलाय. युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार त्यांनी पटकावलाय. सात कोटी रुपयांचा हा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हे वृत्त समोर आल्यापासून डिसले यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतोय. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनीही डिसले यांच्या या यशानंतर त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

‘शिक्षण क्षेत्रातील खऱ्या नेतृत्त्वाला मानाचा मुजरा’ (Kudos to The Real Leadership in Education)….अशा आशयाचं ट्विट करत मुंढे यांनी डिसले यांचं कौतुक केलंय. ट्विटसोबत रणजितसिंह डिसले यांचा फोटो शेअर करताना,  “७ कोटीचा ग्लोबल टीचर पुरस्कार ZP गुरुजी – रणजितसिंह डीसले यांना सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते जगातील सर्वोत्तम शिक्षक ठरले आहेत”, असं म्हणत मुंढेंनी डिसलेंचं अभिनंदन केलं.


दरम्यान, लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी काल यासंदर्भातली घोषणा केली. जगभरातील १४० देशातील १२ हजारांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनामधून अंतिम विजेता म्हणून डिसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

आणखी वाचा- सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार

पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केलं आहे. यामुळे ९ देशांमधल्या हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जाईल. रणजितसिंह डिसले यांना मिळालेली रक्कम टीचर इनोव्हेशन फंडाकरता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- जागतिक पुरस्कार जिंकणाऱ्या मराठमोळ्या शिक्षकाचं राज ठाकरेंनी केलं कौतुक, म्हणाले…

पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील नऊ शिक्षकांना देण्याचे रणजितसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे विविध नऊ देशांतील हजारो शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते ‘टीचर इनोव्हेशन फंड’करीता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळेल. याबाबतची माहिती स्वतः डिसले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

सोलापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करीत असताना रणजितसिंह डिसले यांच्या सेवेची दखल जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सर्वप्रथम घेतली होती. त्यांच्याच प्रोत्साहनामुळे डिसले यांना आपले काम जागतिक पातळीवर नेता आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 8:35 am

Web Title: solapur teacher ranjitsingh disle honored with global teacher praised by ips officer tukaram mundhe sas 89
Next Stories
1 सोलापूरच्या शिक्षकाला सात कोटींचा जागतिक पुरस्कार
2 दहा दिवसांत विद्यार्थ्यांची उपस्थिती जवळपास दुप्पट
3 देशातील दहा उत्कृष्ट पोलीस ठाण्यांमध्ये राज्यातील सर्वच अपात्र
Just Now!
X