सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे रस्त्याचे काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांनी पगार न मिळाल्यामुळे प्रक्षुब्ध होत दगडफेक केली. यात तीन पोलीस जखमी झाले आहेत.
रत्नागिरी-कोल्हापूर-सोलापूर-नागपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या टाळेबंदीतही सुरू आहे. सांगोला तालुक्यात हे काम सुरू असताना तेथील कामगारांनी संबंधित कंत्राटदाराकडे थकलेला पगार मागितला असता तो न मिळाल्यामुळे तसेच काम थांबवून मूळ गावी परत जाण्यासही परवानगी न दिल्यामुळे कामगार संतापले. त्यातून कंत्राटदाराच्या जुनोनी येथील कार्यालयासमोरील वाहनांची तोडफोड करण्यात आली. तेव्हा पोलिसांना पाचारण करण्यात आले. नंतर प्रकरण आणखी चिघळले. त्यानंतर या मजुरांनी पोलिसांवर दगडफेक केली यामध्ये तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 1:37 am