पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना चिखली येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली. कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत दोन दिवसाच्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आज सकाळी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे दाखल झाले. कार्यक्रम आटोपून ते वाशीम जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात आले होते. त्याठिकाणी त्यांनी शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहित करण्यासाठी स्वतः श्रमदान केले.

sadabhau_149227925138_650x425

uddhav balasaheb thackeray criticized mahayuti candidate sandipan bhumre
मद्य परवान्यांचा विषय ठाकरे गटाकडून ऐरणीवर; उमेदवारी जाहीर होताच भुमरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न
केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
kolhapur mla prakash awade, claim on hatkanangale lok sabha seat
“मी महायुतीचाच! मोदींना पंतप्रधान करण्यासाठी लढणार”, बंडखोर आमदार प्रकाश आवाडे यांचा पवित्रा
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

त्यानंतर त्यांची कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या समवेत सभा पार पडली. सायंकाळी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे सभा घेतली. ही सभा पार पडल्यानंतर ते चिखली येथे मुक्कामासाठी निघाले. यावेळी त्यांच्यासोबत वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर होते. मात्र डोणगाववरून चिखलीला येत असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांना उलट्यांसोबत श्वास घेताना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना चिखली येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. सुहास खेडेकर यांनी त्यांची तपासणी केली असून, प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. डॉक्टर सदाभाऊ खोत यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.