08 August 2020

News Flash

डॉक्टर दाम्पत्याच्या हत्याप्रकरणी बंद

हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी सहा पथके कार्यरत

माथेफिरुने त्या तरुणीवर एक - दोन नव्हे तर तब्बल २१ वेळा चाकूने वार केले.

इस्लामपुरातील डॉक्टर दांपत्याची हत्या होऊन ४८ तासांचा अवधी उलटला तरी कोणतेही धागेदोर हाती न लागल्याने तपास यंत्रणा अद्याप अंधारातच चाचपडत आहे. शनिवारी रात्री राहत्या घरी डॉक्टर दांपत्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. ही घटना तब्बल दहा तासांनी रविवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे हल्लेखोरांना पसार होण्यास बराच अवधी मिळाला. या भ्याड हत्येचा निषेध करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात सोमवारी बंद पाळण्यात आला. शहरातील डॉक्टरांनी मूकमोर्चा काढून हल्लेखोरांचा लवकरात लवकर शोध करण्याची मागणी केली.
इस्लामपुरातील धरित्री हॉस्पिटलमध्ये राहत्या घरात डॉ. प्रकाश कुलकर्णी व डॉ. अरुणा कुलकर्णी या डॉक्टर दांपत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. बंगल्याच्या मागील बाजूने असलेल्या पाईपवरून चढून जाउन दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या या दोघांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली.
हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी सहा पथके कार्यरत करण्यात आली असल्याचे उपअधीक्षक वैशाली िशदे यांनी सांगितले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक स्वतंत्रपणे या हल्लेखोरांचा शोध घेत आहे. वेगवेगळ्या शक्यता लक्षात घेऊन तपास करण्यात येत आहे. इस्पितळात काम करणाऱ्या परिचारिका मंगला वाघमारे, सुचित्रा साव्होत्रे, रजनी सरगर, सीमा यादव यांच्यासह माळी काम करणारा सूरज जाधव यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. याशिवाय नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने या संबंधाने डॉक्टरांशी कोण कोण संपर्कात आले याची यादी तयार करण्यात येत आहे. या सर्वाकडे चौकशी करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी डॉक्टरांचे दोन भ्रमणध्वनी चोरीस गेले आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात नोंदही करण्यात आली आहे. या घटनेवर आता पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. मात्र अद्याप या हल्ल्याची उकल होईल असे काहीही पोलिसांच्या हाती लागलेले नाही.
तपास यंत्रणा योग्य दिशेने तपास करीत असल्याचे उपअधीक्षक श्रीमती िशदे यांनी सांगितले, मात्र अद्याप तपासात फारसी प्रगती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तपासासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सहा पथकांचा सातत्याने अहवाल घेतला जात असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, या हत्येचा आज वैद्यकीय क्षेत्राने बंद पाळून निषेध केला. वाळवा तालुक्यातील सर्व रुग्णालये आज बंद ठेवण्यात आली होती. सकाळी राजारामबापू बीएड महाविद्यालयापासून डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी मूकमोर्चा काढला. प्रशासकीय इमारतीत असलेल्या तहसील कार्यालयात मोर्चाने जाऊन निवेदन दिले. या हल्लेखोरांचा लवकरात लवकर तपास करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. या मोर्चामध्ये आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुधीर बनसोडे, इस्लामपूर शहरचे अध्यक्ष डॉ. अमृत पाटील, माजी अध्यक्ष अतुल मोरे, दंतचिकित्सक सचिन घनक, अमित पाटील, मेडिकल असोसिएशनचे दीपक पाटील, सुरेंद्र गोडसे, दिगंबर वडगावकर आदी या मोर्चात सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2015 2:20 am

Web Title: strike for doctor conjugal murder case
टॅग Sangli
Next Stories
1 दादा-बाबा, नंबर प्लेट.. वाहनधारकांविरुद्ध कारवाई
2 पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेला सुरुवात
3 केंद्राकडून सिंचनाचे २१ पैकी सहा प्रस्ताव मंजूर
Just Now!
X