News Flash

अडीचशे रुपयांसाठी विद्यार्थ्याला धावत्या रेल्वेतून फेकले

जळगावमधील धक्कादायक प्रकार

अडीचशे रुपयांसाठी विद्यार्थ्याला धावत्या रेल्वेतून फेकले
प्रातिनिधीक छायाचित्र

भागलपूर-सूरत तात्पीगंगा एक्स्प्रेसने बहाणपूर येथून जळगावला जात असलेल्या तरुणाला धावत्या रेल्वेतून फेकून दिल्याची घटना घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या साबीर शेख जुम्मा या तरुणाला दहा ते बारा तरुणांनी अमानुषपणे मारहाण केली. त्यानंतर या तरुणांनी साबीरकडे असलेले २५० रुपये आणि मोबाईल हिसकावून घेत त्याला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकले. आज (मंगळवारी) दुपारी एकच्या सुमारास ममुराबाद नाक्याजवळील रेल्वे लाईनवर ही घटना घडली़.

दहा ते बारा तरुणांनी धावत्या ट्रेनमधून खाली फेकल्यानंतर जखमी अवस्थेतील साबीरने रिक्षातून खंडेराव येथील त्याच्या काकांचे घर गाठले आणि घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. साबीरच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़.

साबीर हा लालबाग येथील उर्दू शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आह़े. आई-वडील, भाऊ व बहीण असा त्याचा परिवार असून त्याचे वडील बहाणपूर रेल्वे स्थानकावर शितपेये विक्रीचे दुकान लावतात़. साबीर त्याच्या जळगावमधील खंडेरावनगर येथे राहणाऱ्या काकांची भेट घेण्यासाठी बहाणपूर रेल्वे स्थानकावरून तात्पीगंगा एक्स्प्रेसमध्ये बसला होता. त्यावेळी १० ते १२ तरुणांनी त्याला अमानुष मारहाण केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2017 9:35 pm

Web Title: student thrown out of moving train in jalgaon
Next Stories
1 धुळ्यातील पोलीस अधिकाऱ्याच्या घरात चोरी
2 मासेमारीसाठी स्फोटकांचा वापर
3 राज्यात केरोसिनचा पुरवठा तीन वर्षांमध्ये निम्म्यावर!
Just Now!
X