News Flash

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या बहीण आणि भावोजींचा अपघातात मृत्यू

बीडजवळ भीषण अपघात

प्रातिनिधिक छायाचित्र

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. मुनगंटीवार यांची चुलत बहीण आणि भावोजी यांचा भरधाव कार पुलाखाली पडून अपघाती मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी ही दुर्देवी घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी रात्री उशीरा गेवराई तालुक्यातील चकलांबा गावानजीक एक भरधाव कार पुलावरुन खाली पडून भीषण अपघात झाला. अपघातामध्ये ममता तगडपल्लेवार आणि विलास तगडपल्लेवार या दाम्पत्यांचा मृत्यू झाला आहे. मृत दाम्पत्य माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहीण व भावोजी असल्याची माहिती समोर आली आहे.

मृत तगडपल्लेवार दाम्पत्य पुसद येथून स्वतःच्या वाहनाने पुण्याला मुलाला भेटण्यासाठी निघाले होते. त्यावेळी दुर्देवी अपघात झाला. तिंतरवणी येथे ही गाडी भरधाव असल्याने पुलाखाली जाऊन अपघात झाला. यामध्ये दोघे पती पत्नी जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 10:57 pm

Web Title: sudhir mungantiwar sister accident near beed nck 90
Next Stories
1 महाराष्ट्रात आज आठ हजार ८०७ नव्या करोनाबाधितांची नोंद, ८० रुग्णांचा मृत्यू
2 लंडनला २१ डझन हापूस निर्यात…मुहूर्ताच्या पहिल्या पेटीला ५१ पौंडचा विक्रमी दर
3 पालघरमधील नौदल अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
Just Now!
X